Women's T20 WC South Africa reach final for first time beat England by six runs in thrilling semi-final  
क्रीडा

WT20 WC: यजमान दक्षिण आफ्रिकेने रचला इतिहास! रोमहर्षक उपांत्य फेरीत इंग्लंडला चारली धूळ

दक्षिण आफ्रिकेने रोमहर्षक उपांत्य फेरीत इंग्लंडचा सहा धावांनी पराभव केला अन्...

सकाळ ऑनलाईन टीम

England vs South Africa Women's T20 WC : यजमान दक्षिण आफ्रिकन महिला संघाने शुक्रवारी येथे झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत माजी विजेत्या इंग्लंड संघावर ६ धावांनी विजय मिळवला आणि पहिल्यांदाच टी-२० विश्‍वकरंडकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता येत्या रविवारी जेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकन संघासमोर पाच वेळा विश्‍वविजेत्या ठरलेल्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान असणार आहे.

दक्षिण आफ्रिकेकडून इंग्लंडसमोर १६५ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. शबनीम इस्माईल, अयाबोंगा खाका व नदीन क्लार्क यांनी प्रभावी कामगिरी करीत इंग्लंडच्या फलंदाजांना बांधून ठेवले. डॅनी वॅटने ३४ धावांची, सोफीया डंकले हिने २८ धावांचीखेळी साकारली. अयाबोंगा खाका हिने अव्वल दर्जाची गोलंदाजी करताना २९ धावा देत ४ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

याआधी दक्षिण आफ्रिकन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लॉरा वोलवॉर्डट्‌ व ताझमिन ब्रिटस्‌ या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी करताना संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली.

संक्षिप्त धावफलक : दक्षिण आफ्रिका - २० षटकांत ४ बाद १६४ धावा (लॉरा वोलवॉर्डट्‌ ५३, ताझमिन ब्रिटस्‌ ६८, मेरीझॅन कॅप नाबाद २७, सोफी एक्लेस्टोन ३/२२) विजयी वि. इंग्लंड २० षटकांत ८ बाद १५८ धावा (डॅनी वॅट ३४, सोफीया डंकले २८, नॅट सीव्हर ४०, हेथर नाईट ३१, अयाबोंगा खाका ४/२९, शबनीम इस्माईल ३/२७).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : मानाचा चौथा तुळशीबाग गणपती बेलबाग चौकात दाखल, पाहा थेट प्रक्षेपण

Pune Metro : गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोचा मोठा निर्णय; रात्री 11 वाजेपर्यंत सलग 41 तास धावणार मेट्रो, प्रवाशांना दिलासा

Latest Maharashtra News Updates : ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी विदर्भात बैठक

10,000 कोटींच्या मालकाची बायको, परंतु अभिनेत्री राहिली गटारीशेजारच्या झोपडीत, कारण ऐकून थक्क व्हाल

Chandra Grahan 2025: पितृपक्षाच्या पहिल्याच दिवशी लागणार चंद्रग्रहण, एक दिवस आधीच करा तुळशीशी संबंधित 'ही' कामे

SCROLL FOR NEXT