T20 WC INDW vs AUSW LIVE ESAKAL
क्रीडा

T20 WC INDW vs AUSW : भारत शेवटच्या षटकापर्यंत भिडला; मात्र कांगारूंनी 5 धावांनी विजय मिळवत गाठली फायनल

अनिरुद्ध संकपाळ

T20 WC INDW vs AUSW : भारताने ऑस्ट्रेलियाच्या 173 धावांचे आव्हान पार करताना झुंजार वृत्ती दाखवत 167 धावांपर्यंत मजल मारली. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने 52 धावांची झुंजार अर्धशतकी खेळी केली. मात्र 15 व्या षटकात दुसरी धाव घेताना हरमनप्रीतची बॅट अडकली अन् ती धावबाद झाली. भारताने सामना तिथेच हरला. भारताकडून जेमिमाह रॉड्रिग्जने 24 चेंडूत 43 धावांची आक्रमक खेळी करत हरमनला चांगली साथ दिली.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने महिला टी 20 वर्ल्डकपच्या सेमी फायनल सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 173 धावांचे तगडे आव्हान ठेवले. ऑस्ट्रेलियाकडून बेथ मूनीने 54 धावांची अर्धशतकी तर कर्णधार मेघ लेनिंगने नाबाद 49 धावांची दमदार खेळी केली. याचबरोबर अॅश्लेघ गार्डनेर 18 चेंडूत 31 धावा चोपल्या. भारताकडून शिखा पांडेने 2 विकेट्स घेतल्या.

जोनासेनने भारताचे टेन्शन वाढवले. 

19 वे षटक टाकणाऱ्या जोनासेनने स्नेह राणाला बाद करत फक्त 4 धावा दिल्या. यामुळे शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी 16 धावांचे टार्गेट आले.

रिचा घोष झाली बाद 

हरमन बाद झाल्यानंतर रिचा 17 चेंडूत 14 धावा करून बाद झाली. यामुळे चेंडू आणि धावांमधील अंतर देखील वाढले.

133-5 : भारताला मोठा धक्का, हमनची बॅट अडकली अन्

भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर अर्धशतकानंतर विचित्र पद्धतीने धावबाद झाली. तिची बॅट अडकल्यामुळे ती क्रीजमध्ये वेळेत पोहचू शकली नाही.

111-4 (13 Ov) : भारताची धावगती मंदावली

जेमिमाह रॉड्रिग्ज बाद झाल्यानंतर भारताची धावगती मंदावली. हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष यांनी भारताला 13 षटकात 4 बाद 111 धावांपर्यंत मजल मारली.

97-4 : भारताला मोठा धक्का 

आज भलत्याच लयीत असलेल्या जेमिमाह रॉड्रिग्जने आक्रमक फलंदाजी करत 24 चेंडूत 43 धावा चोपल्या. मात्र तिला डार्सी ब्राऊनने 11 व्या षटकात बाद करत हरमन - जेमिमाहची 69 धावांची भागीदारी तोडली.

INDW 93/3 (10) : हरमन - जेमिमाहने आणली रंगत

भारताची अवस्था 3 बाद 28 धावा अशी झाली असताना जेमिमाह रॉड्रिग्ज आणि हरमनप्रीत कौरने चौथ्या विकेटसाठी नाबाद 65 धावांची भागीदारी रचली. या दोघांनी भारताला 10 षटकात 93 धावांपर्यंत पोहचवले.

59-3 (6 Ov) : पॉवर प्लेमध्ये भारताचा धुमाकूळ मात्र..

ऑस्ट्रेलियाने 173 धावांचे मोठे आव्हान ठवेल्यानंतर भारताने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र स्मृती मानधना 2 शफाली वर्मा 9 तर यस्तिका भाटिया 4 धावा करून बाद झाल्या.

मात्र त्यानंतर हरमनप्रीत कौर आणि जेमिमाह रॉड्रिग्जने फटकेबाजी करत पॉवर प्लेमध्येच 59 धावांपर्यंत मजल मारली.

52-1 : राधा यादवने दिला भारताला दिलासा 

ऑस्ट्रेलियाची 52 धावांची सलामी देणारी जोडी अखेर राधा यादवने फोडली. तिने एलिसा हेलेला 25 धावांवर बाद केले.

AUSW 47/0 (7) : बेथ मूनी - एलिसा हेले आक्रमक 

पहिल्या तीन षटकात सावध फलंदाजी करणाऱ्या बेथ मूनीने आक्रमक पवित्रा घेतला. तिने हेलेच्या साथीने आठव्या षटकात अर्धशतकी मजल मारून दिली.

ऑस्ट्रेलियाची चांगली सुरूवात 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या तीन षटकात बिनबाद 21 धावा केल्या. एलिका हेलेने आक्रमक फलंदाजी केली तर बेथ मूनीने तिला सावध साथ दिली.

भारताची कर्णधार फिट 

हरमनप्रीत कौरच्या फिटनेसबाबत साशंकता होती. आजचा सामना हरमनप्रीत कौर खेळणार की नाही अशी चर्चा असतानाच कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरली.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली 

ऑस्ट्रेलियाने भारताविरूद्धच्या सेमी फायनल सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

भारत - ऑस्ट्रेलियाला थोड्याच वेळात सुरूवात

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमी फायनल सामन्याला थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. नाणेफेकीपूर्वी भारतीची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णदार स्मृती मानधना यांनी खेळपट्टीची पहाणी केली.

भारताची सर्वात मोठी परीक्षा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT