Women's World Cup 2022 England Women team bundle up Team India  ESAKAL
क्रीडा

Women's World Cup: इंग्लंडविरूद्ध टीम इंडिया ढेपाळली; रडत खडत शंभरी पार

सकाळ डिजिटल टीम

माऊंट माऊनगनुई : आयसीसी महिला वर्ल्डकप (Women's World Cup 2022) स्पर्धेत आज भारताला (India Women) गेल्या वर्ल्डकप फायनलचा बदला घेण्याची संधी होती. मात्र गतविजेत्या इंग्लंडने (England Women) भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडून सामन्यावर चांगली पकड निर्माण केली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताचा संपूर्ण संघ 134 धावात ढेर झाला.

सलामीवीर स्मृती मानधनाची (Smriti Mandhana) 35 धावांची खेळी समाप्त झाल्यानंतर भारताची घसगुंडी उडाली. भारताची अवस्था 3 बाद 61 धावांवरून 7 बाद 86 अशी बिकट झाली. त्यामुळे भारत शंभरी तरी पार करू शकेल का अशी शंका निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर विकेटकिपर रिचा घोष आणि झुलन गोस्वामी यांनी आठव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचत भारताला शंभरच्या पार पोहचवले.

मात्र 33 धावांची खेळी करणारी रिचा धावबाद झाली आणि ही जोडी फटली. त्यानंतर 20 धावा करणारी झुलन गोस्वामी देखील बाद झाली. अखेर भारताचा डाव 134 धावात आटोपला. इंग्लंडकडून कार्लेट डेनने भेदक मारा करत 23 धावात 4 बळी टिपले. तर अॅनाने देखील दोन विकेट घेत तिला चांगली साथ दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT