women's world cup 2022 sakal
क्रीडा

VIDEO : तिने शेन वॉर्न सारखा चेंडू टाकला अन्...

ऑस्ट्रेलियन दिग्गजाला महिला फिरकीपटू इलाना किंगनं अशी वाहिली श्रद्धांजली

सकाळ वृत्तसेवा

Women's World Cup: ऑस्ट्रेलियन दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याचं शुक्रवारी निधन झाले. निधनानंतर सर्व दिग्गजांनी सोशल मिडिया वरून त्याला श्रद्धांजली वाहिली. निधनानंतर जगभरात खेळलेल्या सर्व क्रिकेट सामन्यांमधून विविध प्रकारे दिग्गजाला श्रद्धांजली वाहण्यात आली.

सध्याच्या घडीला न्यूझीलंडमध्ये महिला वर्ल्ड कप स्पर्धा सुरु आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्ध इंग्लंड यांच्यात 5 मार्चला रंगलेल्या सामन्यात एक खास क्षण पाहायला मिळाला. इंग्लंड संघाची फलंदाज टॅमी ब्युमाँटची 28 व्या षटकात लेग ब्रेक चेंडूवर विकेट गेली. ऑस्ट्रेलिया संघाची फिरकीपटू इलाना किंग (alana king) हिने शेन वॉर्न जसा चेंडू टाकून प्रतिस्पर्ध्याला गुडघे टेकायला लावयचा तशीच काहीसा चेंडू इलाना हिने टाकला आणि यावर तिला विकेटही मिळाली. या विकेटची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. चेंडू मोठ्या प्रमाणात वळला फलंदाजी करणाऱ्या टॅमीला समजला नाही. तिने पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला असता यष्टिरक्षक ऑलिसाने यंष्टीचीत केले.

इलाना किंगने विकेटचा आनंद साजरा केला आणि वॉर्नच्या निधनाबद्धल लावलेल्या काळ्या पट्टीकडे (आर्म-बँड) इशारा केला. तिने ही विकेट शेन वॉर्नला समर्पित केली. तिच्या या लेग स्पिनचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 310 धावसंख्या उभारली होती. ऑस्ट्रेलियाकडून रॅचेल हेन्सने 130 धावा केल्या, संघाची कर्णधार मेग लॅगिंगने 86 धावा केल्या. इंग्लंडचा संघ 8 बळी 298 धावांवर थांबला. हा सामना ऑस्ट्रेलियाने 12 धावांनी हा सामना जिंकला आहे. सामन्यात नेट स्कायव्हरने 85 चेंडूत 109 धावांची खेळी केली. तिच्या या खेळिनेही संघाला सामना जिंकता आला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Pakistan Final: भारत-पाकिस्तान आशिया चषकाच्या जेतेपदासाठी भिडणार; सामना केव्हा, कुठे Live पाहता येणार?

US Flight Chaos: अमेरिकेत एकाच वेळी सर्व विमानांची उड्डाणे थांबवली! 9/11 नंतर पहिल्यांदाच अशी घटना? नेमकं काय घडलं?

IND vs NZ 5th ODI: आता 'बेस्ट प्लेअर' उतरावाच लागणार! भारताच्या Playing XI मध्ये बदल होणार, कुलदीप यादव OUT?

Latest Marathi News Live Update: ‘गोकुळ’ची सर्वसाधारण सभाही गाजणार

Tiger Attack: वाघाने चिमुरड्याला जबड्यात पकडून नेले, बहीण वाचली, पाळण्यातला भाऊ दगावला; भंडाऱ्याच्या तिर्रीची घटना

SCROLL FOR NEXT