Pakistan Women vs India Women Sakal
क्रीडा

पाक कॅप्टनच्या गोड मुलीसोबत भारतीय महिला खेळाडूंचा सेल्फी

सकाळ डिजिटल टीम

Pakistan Women vs India Women : न्यूझीलंडच्या मैदानात सुरु असलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायहोल्टेड ड्रामा रंगला होता. या सामन्यात भारतीय महिला संघाने 107 धावांनी विजय मिळवत स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. मैदानात एकमेकांच्या विरोधात ठाकलेल्या खेळाडूंनी फिल्ड बाहेर पडताच प्रेमाचा अनोखा संदेश दिल्याचे पाहायला मिळाले. आयसीसीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हा खास क्षण शेअर केला आहे.

पाकिस्तानची बॅटर आणि कर्णधार बिस्माह मारुफ (Pakistan captain Bismah Maroof ) ही आपल्या चिमुकल्या मुलीसह स्पर्धेत सहभागी झाली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील माउंट माउंनगुनाईच्या मैदानात झालेल्या सामन्यानंतर भारतीय महिला संघातील खेळाडूंनी बिस्माह मारुफची चिमुकली फतिमासह सेल्फी घेतला. हा आयसीसीने आपल्या अधिकृत अकाउंटवरुन शेअर केला आहे. टीम स्पिरीटचा फतिमासाठी पहिला धडा, असे खास कॅप्शनही आयसीसीने दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT