Word Shooting  esakal
क्रीडा

Word Shooting : जागतिक नेमबाजीत सुवर्णासह ऑलिंपिकसाठीही पात्रता; रुद्रांक्ष पाटीलचे अभूतपूर्व यश

भारताच्या नेमबाजीतील नवा स्टार ठाण्याचा रुद्रांक्ष पाटील

सकाळ डिजिटल टीम

कैरो (इजिप्त) : भारताच्या नेमबाजीतील नवा स्टार ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलने आपल्या यशाची पताका पुन्हा एकदा फडकावली. येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद नेमबाजीत सुवर्णपदक तर जिंकलेच, पण त्याचबरोबर पुढील वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिंपिकचा कोटाही मिळवला.गेल्या काही महिन्यांपासून कमालीच्या फॉर्मात असलेल्या १८ वर्षांच्या रुद्रांक्षने १० मीटर एअर रायफलच्या अंतिम सामन्यात इटलीच्या डॅनिलो डेनिस सोलाझोचा १७-१३ असा पराभव केला.

वय वर्ष केवळ १८ असलेला रुद्रांक्ष सिनियर गटाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम खेळत आहे. पात्रता फेरीत त्याने ६३३.९ गुण मिळवून पहिले स्थान मिळवत आपल्या क्षमतेची चुणूक दाखवली. विशेष म्हणजे हे यश मिळवताना त्याने चायनाच्या दोन नेमबाजांना पाठीमागे टाकले. यात विद्यमान विश्वविजेत्या आणि ऑलिंपिक विजेत्या यांग होरान याचा समावेश आहे.पॅरिस ऑलिंपिकसाठी नेमबाजीत भारताला मिळालेला हा दुसरा कोटा आहे. भोवनेश मेंदिराताने ट्रॅप इव्हेंटमध्ये पहिला कोटा मिळवला. शॉर्टगन जागतिक अजिंक्यपद स्पर्धा क्रोएशियात झाली होती.

रुद्रांक्षने शेंग लिहो याला ०.१ गुणांनी मागे टाकले आणि तो २६१.९ गुणांसह सुवर्णपदकाच्या सामन्यासाठी पात्र ठरला. या लिहोला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले; तर विश्वविजेता होरान चौथा आला.अंजूम मोदगिल हिने अशाच जागतिक स्पर्धेत महिलांच्या एअर रायफलमध्ये रौप्यपदक जिंकून टोकियो ऑलिंपिकसाठी पात्रता मिळवली होती.

कैरोतील या स्पर्धांत भारत पदकांच्या शर्यतीत चीननंतर दुसऱ्या स्थानावर आहे. रुद्रांक्ष सुवर्णपदकाची कामगिरी करत असताना ५० मीटर रायफल प्रोन मिश्र प्रकारात निश्चल आणि सूर्या प्रतापसिंग यांना ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. अमेरिकेच्या जोडीकडून त्यांचा ६-१६ असा पराभव झाला. अभिवनच्या पंक्तीत रुद्रांक्षचे हे यश अभूतपूर्व आहे. एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा भारतीय आहे. याअगोदर २००६ मध्ये अभिवन बिंद्राने सुवर्णपदक जिंकले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता AI ठरवणार संघात कोणाला संधी मिळणार! क्रिकेटमध्ये तंत्रज्ञानाचा नवा अध्याय; आकडेवारीपासून थेट संघ निवडीसाठी वापर होणार

Raigad Shivrajyabhishek celebration: रायगडावर तिथीनुसार ३५३ वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गडावर शिवमय वातावरण

Vat Purnima 2026: घराजवळ वडाचं झाड नाहीये? मग 'अशी' करा घरच्या घरीच वटपौर्णिमेची पूजा; जाणून घ्या सोपा उपाय

Latest Marathi News Live Update : धुळे जिल्ह्यात पावसाची दांडी; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

राम मंदिरातील धार्मिक कार्यात असायचा सहभाग, पण मागे सुरू होतं भलतंच; टिन्नू यादवच्या कारनाम्याने अयोध्या हादरली!

SCROLL FOR NEXT