Aditi Swammy 
क्रीडा

World Archery Championship: आदिती स्वामीची ऐतिहासिक कामगिरी! भारतानं पहिल्यांदाच जिंकल 'गोल्ड'

आदिती आधुनिक तिरंदाजीत सर्वात तरुण महिला चॅम्पियन बनली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

World Archery Championship: जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशीपमध्ये भारताच्या आदिती गोपिचंद स्वामी हिनं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या स्पर्धेत वैयक्तीक खेळ प्रकारात तीनं सुवर्ण पदकाला गवसणी घातली.

हे सुवर्ण पदक भारतासाठी महत्वाचं आहे कारण भारतानं अशा प्रकारे वैयक्तिक तिरंदाजीत पहिल्यांदाच सुवर्णपदक मिळवलं आहे. यामुळं आदिती ही आधुनिक तिरंदाजीत सर्वात तरुण महिला चॅम्पियन बनली आहे. (World Archery Championship Aditi Gopichand Swamy Historic Performance India won first time gold medal)

पदक जिंकल्यानंतर आदितीनं प्रतिक्रिया देताना आनंद व्यक्त केला. तीनं म्हटलं की, "मी खूपच खूश आहे कारण यापूर्वी भारताला या स्पर्धेत वैयक्तीक प्रकारात एकही गोल्ड मेडल मिळालं नव्हतं. पण मला वैयक्तिक आणि टीमसाठी गोल्ड मेडल आणण्याची संधी मिळाली. मला हे अपेक्षित नव्हतं की, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मला इतका चांगला परफॉर्मन्स करायला मिळेल. पण आता यापुढेची माझा असाच चांगला परफॉर्मन्स राहिलं. (Latest Sport News)

सांघिक प्रकारात आम्हाला पहिल्याच दिवशी गोल्ड मेडल मिळालं होतं. त्यामुळं मी काहीशी निश्चिंत होते कारण माझ्यावर कुठलाही दबाव नव्हता. याचा मला चांगला फायदा झाला, ही गोष्ट सकारात्मक पद्धतीनं घेत वैयक्तिक खेळात मी चांगली कामगिरी केली, अशा शब्दांत आदितीनं खेळादरम्यानची परिस्थिती कथन केली. (Latest Marathi News)

पदक मिळाल्यानंतर अद्याप मी कुठलंही सेलिब्रेशन केलेलं नाही. पण पहिल्यांदा मी घरी फोन केला. घरी सर्वजण माझा खेळ पाहत होते. त्यानंतर मी माझ्या कोचेसशी बोलले तसेच माझ्या सहकारी खेळाडूंशी बोलले, अशा शब्दांत आदिती स्वामीनं माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anand Paranjpe Sharad Pawar Meeting : पक्ष प्रवेश एकनाथ शिंदेंच्या पक्षात, भेट घेतली शरद पवारांची; ठाणेकर आनंद परांजपेंच्या भेटीने चर्चांणा उधाण

Pune : शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा भीषण अपघात, फॉर्च्युनरची रिक्षाला धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

'बालिका वधू'च्या गहनाने १० रुपयांच्या वस्तूपासून बनवला ब्रँड; कमावतेय कोट्यवधी, तुमच्याही घरात असेलच, काय आहे ती वस्तू?

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

SCROLL FOR NEXT