annu rani
annu rani  sakal
क्रीडा

World Athletics Championship : भालाफेकपटू अनु राणीचे पदक थोडक्यात हुकले

Kiran Mahanavar

World Athletics Championship : जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताची स्टार भालाफेकपटू अनु राणीच्या हाती निराशा लागली. अंतिम फेरीत अनु राणीचे पदक थोडक्यात हुकले. राणी सातव्या क्रमांकावर राहिली. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिसऱ्यांदा सहभागी होत असलेल्या अनुने सलग दुसऱ्यांदा जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.

अनु राणीने अंतिम स्पर्धेत 61.12 मीटर भालाफेक करून सातवे स्थान पटकावले. या स्पर्धेत सुवर्णपदक ऑस्ट्रेलियाच्या केल्सी ली बार्बरला मिळाले, ज्याने 66.91 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. रौप्यपदक अमेरिकेच्या कारा विंगरला मिळाले तर कांस्यपदक जपानच्या हारुका किटागुचीला मिळाले.

अनु राणीच्या सहा प्रयत्नांमध्ये तिचा दुसरा प्रयत्न सर्वोत्कृष्ट होता. दुसऱ्या प्रयत्नात त्याने 61.12 मीटर अंतरावर भालाफेक केली. अनु राणीने गुरुवारी जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत 59.60 मीटर थ्रो करून पात्रता झाली होती. तिने ब गटातील पात्रता फेरीत पाचवे स्थान पटकावले आणि दोन्ही गटातील आठव्या सर्वोत्तम प्रयत्नाच्या जोरावर ती अंतिम फेरीसाठी पात्र ठरली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT