India men's relay team 
क्रीडा

India Men's Relay Team: धडक दिली पण पदक हुकले! 4x400 मीटर रिलेमध्ये टीम इंडियाचा अभिमानास्पद घोडदौड

Kiran Mahanavar

World Athletics Championships 4x400m Relay Race Final : जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये नीरज चोप्राने भालाफेकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. मात्र पुरुषांच्या 4x400 मीटर रिले शर्यतीत पदक हुकले. यामध्ये टीम इंडिया पाचव्या स्थानावर राहिला.

भारतासाठी या शर्यतीत अमोज जेकब, राजेश रमेश, मोहम्मद अनास याहिया आणि मोहम्मद अजमल वरियाथोडी यांनी भाग घेतला. टीम इंडियाने ही शर्यत 2 मिनिटे 59.92 सेकंदात पूर्ण केली.

अमेरिकेने पुरुषांच्या 4x400 मीटर रिले शर्यतीत विश्वविक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकले. अमेरिकेने ही शर्यत 2 मिनिटे 57.31 सेकंदात पूर्ण केली. फ्रान्सने रौप्यपदक जिंकले. त्याने ही शर्यत 2 मिनिटे 58.45 सेकंदात पूर्ण केली. ब्रिटनने कांस्यपदक जिंकले. त्याने ही शर्यत 2 मिनिटे 58.71 सेकंदात पूर्ण केली. जमैकाचा संघ चौथ्या तर टीम इंडिया पाचव्या स्थानावर राहिला.

टीम इंडियाने 4x400 मीटर रिले शर्यतीच्या पात्रता फेरीत चांगली कामगिरी केली होती. भारतीय खेळाडूंनी इतिहास रचला आणि पहिल्यांदाच फायनलमध्ये प्रवेश केला. टीम इंडियाने या कालावधीत 2 मिनिटे आणि 59.05 सेकंद घेतले. यासोबत टीम इंडियाने आशियाई विक्रम मोडला होता.

अभिमानास्पद म्हणजे, नीरज चोप्राने भालाफेकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. त्याने अंतिम फेरीत 88.17 मीटर अंतरापर्यंत भालाफेक केली. नीरजचा पहिला थ्रो फाऊल होता. पण दुसऱ्या थ्रोमध्ये त्याला यश आले. या स्पर्धेत पाकिस्तानचा अर्शद नदीमही सहभागी झाला होता. त्याने रौप्य पदक जिंकले. अर्शदने 87.82 मीटर अंतरापर्यंत भाला फेकला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT