Indian men’s 4x400m relay team qualifies for final with new Asian record sakal
क्रीडा

World Athletics Championships: भारतीय रिले टीमने रचला इतिहास! सर्व आशियाई संघांचे विक्रम मोडत गाठली अंतिम फेरी

Kiran Mahanavar

Indian Relay Team In World Athletics Championships 2023 : भारताच्या पुरुषांच्या 4x400 रिले संघाने जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरून इतिहास रचला आहे. शनिवारी भारतीय संघ प्रथमच अंतिम फेरीत धडक मारण्यात यशस्वी ठरला.

भारतीय संघाने 2 मिनिटे 59.05 सेकंदात शर्यत पूर्ण केली, जी कोणत्याही आशियाई संघापेक्षा जास्त होती. भारताच्या संघात मोहम्मद अजमल, राजेश रमेश, अमोज जेकब आणि मोहम्मद अनस याहिया यांचा समावेश होता.

टीम इंडियाने दुसरे स्थान मिळवून प्रथमच वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवली आहे. फक्त अमेरिकेचा संघ भारताच्या पुढे होता. अमेरिकेच्या रिले संघाने 2 मिनिटे 58.47 सेकंदात शर्यत पूर्ण केली. आणि आता अंतिम सामना रविवारी होणार आहे. या शर्यतीसह भारताचा रिले संघ आशियातील सर्वोत्तम संघ ठरला आहे.

भारतापूर्वी, आशियाई संघांमध्ये सर्वात वेगवान रिले संघाचा विक्रम जपानच्या नावावर होता, ज्याने 2 मिनिटे 59.51 सेकंदात शर्यत पूर्ण केली. यापूर्वी, भारताचा विक्रम 3 मिनिटे 00.25 सेकंदांचा होता, जो 2020 ऑलिम्पिकमध्ये त्याच भारतीय संघाने (मोहम्मद अजमल, राजेश रमेश, अमोज जेकब आणि मोहम्मद अनस याहिया) केला होता. त्यानंतर भारतीय संघ अंतिम फेरीला मुकला होता.

या रिले शर्यतीत भारताकडून संथ सुरुवात झाली होती. मोहम्मद अनस याहियाने संघाला संथ सुरुवात करून दिली. पहिल्या फेरीनंतर भारत सहाव्या क्रमांकावर होता. यानंतर अमोज जेकबने संघाचा वेग वाढवला आणि भारताला दुसऱ्या स्थानावर नेले. यानंतर मोहम्मद अजमल आणि राजेश रमेश यांनी आपल्या उत्कृष्ट वेगाच्या जोरावर शेवटच्या दोन टप्प्यात भारताला अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. अशाप्रकारे इतिहास रचत भारतीय रिले संघाने प्रथमच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT