world athletics to introduce repechage round at paris games sakal
क्रीडा

ऑलिंपिकमध्ये पदक जिंकण्याची संधी वाढली!

कुस्तीप्रमाणे आता ॲथलेटिक्समध्येही रिपेचेज फेरीचा अवलंब; जागतिक ॲथलेटिक्स संघटनेकडून मान्यता

सकाळ वृत्तसेवा

माँटे कार्लो (मोनॅको) : जगभरातील ॲथलीट अर्थातच धावपटूंसाठी आनंदाची बातमी आहे. २०२४ मध्ये पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारासाठी नव्या नियमाचा अवलंब करण्यात येणार आहे. कुस्ती या खेळाप्रमाणे आता ॲथलेटिक्समध्येही रिपेचेज या फेरीला सुरुवात होणार आहे. जागतिक ॲथलेटिक्स संघटनेकडून या नव्या नियमाला मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आता जगभरातील धावपटूंना उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी प्राथमिक फेरीनंतर रिपेचेजच्या रूपात आणखी एक संधी उपलब्ध होणार आहे.

पहिल्या फेरीत सहभागी झाल्यानंतरही ज्या खेळाडूंना पुढल्या फेरीत प्रवेश करता आला नाही, अशा खेळाडूंना रिपेचेज फेरीमध्ये सहभागी होता येणार आहे. याचा अर्थ खेळाडूंना या फेरीच्या रुपात उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी आणखी एक संधी लाभणार आहे. त्यामुळे आता ॲथलेटिक्समधील प्रकारासाठी खेळाडूंना चार फेऱ्यांमधून जावे लागणार आहे. प्रथम फेरी, रिपेचेज फेरी, उपांत्य फेरी व अंतिम फेरी अशा चार फेऱ्यांनंतर पदकविजेते खेळाडू मिळणार आहेत.

वैयक्तिक प्रकारासाठीच नवा नियम

रिपेचेज फेरीचा नवा नियम हा फक्त वैयक्तिक प्रकारासाठी तयार करण्यात आला आहे. यामध्ये २०० मीटर ते १५०० मीटर शर्यतींचा समावेश आहे. तसेच अडथळा शर्यतीमध्येही रिपेचेजच्या नियमाचा वापर करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT