Prannoy H.S. sakal
क्रीडा

World Badminton : पुरुषांच्या एकेरीत एच. एस. प्रणॉय नवव्या स्थानावर

सात्विक - चिरागची तिसऱ्या स्थानी झेप

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : सात्विक साईराज रंकीरेड्डी - चिराग शेट्टी या भारतीय जोडीने जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. इंडोनेशिया ओपन १०० ही बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्यानंतर पुरुष दुहेरीतील भारतीय जोडीला कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थानावर मुसंडी मारता आली आहे.

सात्विक - चिराग या जोडीसाठी २०२३ हे वर्ष अत्यंत चांगले ठरले आहे. या वर्षी दोघांनी मिळून दोन जागतिक टूअर स्पर्धा, स्वीस ओपन व आशियाई अजिंक्यपद स्पर्धा जेतेपदावर मोहोर उमटवली. इंडोनेशिया ओपनच्या अंतिम फेरीत भारताच्या खेळाडूंनी ॲरोन चिए - सोह वुक यिक या विश्‍वविजेत्यांना पराभूत करीत पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अजिंक्यपदाची माळ आपल्या गळ्यात घातली. सात्विक - चिरागच्या या उल्लेखनीय कामगिरीचे फळ त्यांना क्रमवारीतील आगेकूचच्या रूपात मिळत आहे.

अन्य क्रमवारीत भारतीय खेळाडूंकडून निराशा

पुरुष दुहेरी क्रमवारीत सात्विक साईराज रंकीरेड्डी - चिराग शेट्टी या जोडीने तिसरे स्थान पटकावले असले, तरी इतर क्रमवारीत भारतीय खेळाडूंकडून निराशा झाली आहे. पुरुष एकेरी गटामध्ये एच.एस.प्रणॉय नवव्या स्थानावर आहे.

या गटामध्ये प्रणॉयखेरीज एकही भारतीय खेळाडू अव्वल दहामध्ये नाही. महिला एकेरी, महिला दुहेरी, मिश्र दुहेरी या सर्व गटांमध्ये भारताचा एकही खेळाडू अव्वल दहामध्ये नाही. पी. व्ही. सिंधू १२व्या स्थानावर आहे. साईना नेहवाल ३१व्या स्थानावर आहे. ट्रिसा जॉली - गायत्री गोपीचंद महिला दुहेरीत १६व्या स्थानावर कायम आहे.

तैपई ओपनमध्ये सुमार कामगिरी

तैपई ओपन बॅडमिंटन स्पर्धेला मंगळवारपासून सुरुवात झाली. भारतीय खेळाडूंना यामध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. शुभंकर डे, अनंतकुमार जनानी यांना एकेरीत हार पत्करावी लागली. रितूपर्णा पंडा - स्वेतपर्णा पंडा, कृष्णाप्रसाद गरगा - विष्णुवर्धन पंजाला यांचा दुहेरीत पराभव झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

रात्री बसमध्ये झोपलेली, सीटच्या मागून कमरेत हात; सई ताम्हणकरने तोच हात पकडला आणि... स्वतः सांगितला तो प्रसंग

Agricultural Crime : रात्रीतून फळबागेतील डाळिंब लंपास चौसाळ्यातील घटना, गुन्हा नोंदविण्यासाठी वजन-किमतीचा मुद्दा ठरतोय कळीचा

Video : "यापेक्षा कार्टून बरं" जानकी-हृषीकेशमध्ये येणार दुरावा ; घरोघरी मातीच्या चुलीवर प्रेक्षक वैतागले

SCROLL FOR NEXT