Boxing  sakal
क्रीडा

World Boxing : भारतीय खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी

झरीन, लवलिना, स्वीटी, नीतूचे पदक पक्के

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : यजमान भारताच्या महिला खेळाडूंनी जागतिक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये बुधवारी उल्लेखनीय कामगिरी केली. निखत झरीन, लवलिना बोर्गोहेन, नीतू घंघास व स्वीटी बूरा या चार खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे पदक पक्के केले. आता उपांत्य फेरीत पराभव झाल्यानंतरही या खेळाडूंना किमान ब्राँझपदक पटकावता येणार आहे.

निखतने ५० किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत थायलंडच्या चुथमत रकसात हिला ५-२ असे हरवले. थायलंडची खेळाडू हिने दोन वेळा जागतिक स्पर्धेचे ब्राँझपदक पटकावले होते. निखत - चुथमत यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली. निखत हिने तांत्रिक बाबीमध्ये सरस खेळ केला आणि विजय मिळवला हे विशेष.

नीतू हिच्यासमोर ४८ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत जपानच्या मडोका वाडा हिचे आव्हान होते. जपानच्या मडोका हिने जागतिक स्पर्धेमध्ये दोन ब्राँझपदके जिंकली होती. नीतू - मडोकामधील लढत रेफ्रींकडून दुसऱ्या फेरीनंतर थांबवण्यात आली. नीतूच्या आक्रमक खेळापुढे मडोकाचा निभाव लागला नाही.

साक्षी, मनीषा, जास्मिन, नूपुरचा पराभव

भारताच्या चार खेळाडूंना मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. साक्षी चौधरी हिला ५२ किलो वजनी गटात, मनीषा माऊन हिला ५७ किलो वजनी गटात आणि जास्मिन लाम्बोरियाला ६० किलो वजनी गटात निराशेचा सामना करावा लागला. नूपुरचीही हार झाली. यामुळे चौघांचे आव्हान तिथेच संपुष्टात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT