WORLD CHESS DAY 2022 History Gupta Empire UN Famous Quotes
WORLD CHESS DAY 2022 History Gupta Empire UN Famous Quotes esakal
क्रीडा

World Chess Day 2022 : भारतातील गुप्त राजवट अन् बुद्धीबळ इतिहास

अनिरुद्ध संकपाळ

WORLD CHESS DAY 2022 : 20 जुलै हा जागतिक बुद्धीबळ दिवस म्हणून साजरा केला जातो. बुद्धीबळ या खेळाला विश्वनाथन आनंदने (Viswanathan Anand) एक ग्लॅमर निर्माण करून दिले. आता त्याचे हे बॅटन युवा रमेशबाबू प्रज्ञानंदा (Rameshbabu Praggnanandhaa), मॅग्नस कार्लसेन (Magnus Carlsen) हे पुढे नेत आहेत. या सर्वांनी या खेळाचा समाजावर कसा सकारात्मक परिणाम होतो हे देखील सांगितले. दरम्यान आपण जागतिक बुद्धीबळ दिवसाचा इतिहास काय आहे हे पाहणार आहोत.

जागतिक बुद्धीबळ दिवसाचा इतिहास (World Chess Day 2022)

12 डिसेंबर 2019 मध्ये संयुक्त राष्ट संघाच्या सर्वसाधारण बैठकीत जागतिक बुद्धीबळ दिवसाला मान्यता दिली. यावेळी जुलै महिन्याची 20 तारीख निवडण्यात आली. कारण याच दिवशी 1924 ला आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ फेडरेशनची स्थापना पॅरिसमध्ये करण्यात आली होती. या जागतिक फेडरशेन अंतर्गत 150 पेक्षा जास्त बुद्धीबळ फेडरेशन सलग्नित आहेत. ते सर्व सदस्य 1966 पासून जागतिक बुद्धीबळ दिवस साजरा करत होते.

बुद्धीबळाचा इतिहास (History Of Chess)

मॉडर्न आंतरराष्ट्रीय बुद्धीबळात दोन खेळाडूंमध्ये सामना होतो. बुद्धीबळाची निर्मिती ही चतुरंग या खेळातून झाला आहे. पुरातन काळात या खेळात चार खेळाडूंचा समावेश होता. हा खेळ भारतातील गुप्त राजवटीवेळी खेळला जात होता. हा खेळ इ.स. 4 थ्या शतकापासून इ.स. सहाव्या शतकापर्यंत खेळण्यात येत होता.

चतुरंग खेळाचा विस्तार हा पुरातन काळातील सिल्क रोडद्वारे पर्शिया, अरब जगतात झाला. तेथून तो जगभर पसरला. कालांतराने चतुरंगचे नाव शतरंजमध्ये रूपांतरित झाले. सध्याच्या घडीला बुद्धीबळाचे अगिणत प्रकार अस्तित्वात आहेत.

बुद्धीबळ हा परवडणार खेळ असून त्यामुळे तुमची बैद्धिक क्षमता वाढण्यास मदत मिळते. तसेच सर्वसमावेशकता, सहिष्णुता, एकमेकांप्रती आदर आणि न्याय भावना वाढीस लागते. संयुक्त राष्ट्राच्या वेबसाईटनुसार बुद्धीबळ हा संयुक्त राष्ट्राच्या 2030 पर्यंतच्या शाश्वत विकास उद्येशांमधील एक महत्वाचा भाग आहे.

बुद्धीबळातील काही खास 'कोट्स'

  • 'तुमच्या मेंदूचे जिमनॅशियम म्हणते बुद्धीबळट' : ब्लैसे पास्कल (Blaise Pascal)

  • 'ज्यावेळी तुम्ही कमकूवत खेळाडूविरूद्ध तयारी करत असता त्यावेळी तुम्ही अति आत्मविश्वास दाखवण्याचा धोका असतो.' : विश्वनाथन आनंद (Viswanathan Anand)

  • 'तुम्ही जर बुद्धीबळावर प्रेम करत असाल तरच तुम्ही त्यामध्ये काही चांगले मिळवू शकता.' : बॉबी फिसचेर (Bobby Fischer)

  • 'तुमची एकाग्रता आणि तर्क बुद्धीबळामुळे वाढीस लागते. नियमानुसार खेळण्याची शिकवण मिळते. तसेच तुमच्या निर्णयाची जबाबदारी घेणे, अनिश्चित वातावरणात अडचणी कशा सोडवायच्या हे ही बुद्धीबळ शिकवते.' गॅरी कॅसप्रोव्ह (Garry Kasparov)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT