Virat with Grandmother 
क्रीडा

World Cup 2019 : त्या आजींना दिलेलं वचन कोहलीने पाळलं अन्...

वृत्तसंस्था

वर्ल्ड कप 2019 : भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्यात सर्वाधिक लोकप्रिय झाल्या त्या 87 वर्षीय लारुलता पटेल या आजी. भारताने तो सामना जिंकावा, म्हणून त्या एवढे वय असूनही स्टेडियममध्ये येऊन संघाला प्रोत्साहन देत होत्या. सामना झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली त्यांना भेटायला गेला होता. त्यावेळी त्याने त्यांना एक वचन दिले आणि ते दोन दिवसांत पाळलेही. 

कोहलीने त्यांना भेटायला गेल्यावर चारुलता यांना पुढच्या सामन्यांमध्येही आम्ही तुम्हाला प्रेक्षक गॅलरीत पाहू इच्छितो, अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्यांच्याकडे तिकट नसल्याने त्या येऊ शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर ''मी तुम्हाला पुढची सर्व तिकीटं देईन,'' असं आश्वासन कोहलीनं दिलं होतं. 

कोहलीने चारुलता यांना केवळ आश्वासन दिल नाही, तर अवघ्या काही तासात पाळलंही. ''कोहलीने आमच्यासाठी भारताच्या सर्व सामन्यांची तिकीटं पाठवली आहेत. 6 जुलैला लीड्समध्ये होणारा श्रीलंकेविरुद्धचा सामना, दोन्ही सेमीफायनल आणि अंतिम सामन्याचं तिकीट आम्हाला मिळालं आहे,'' अशी माहिती चारुलता यांच्या नातीने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Wari: गुरुवारी दोन्ही पालख्या पुण्यात! वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; 'हे' रस्ते असतील बंद

Low Cost Loan: लोन पाहिजे? मग PPF खात्यावर मिळवा स्वस्तात कर्ज! किती रक्कम मिळते? व्याजदर किती? जाणून घ्या संपूर्ण नियम

Latest Marathi News Update : पुण्यात मोठे ट्रॅफिक बदल; पालखी सोहळ्यामुळे निर्णय

Building Collapsed: चिमुरड्याने रोखली मोठी जीवितहानी, मानखुर्द दुर्घटनेप्रकरणी मालकासह दोघांना अटक; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

कमळीचा मॉडर्न अवतार पाहिलात का? अभिनेत्री विजया बाबरने शेअर केला हटके व्हिडिओ, मरीन ड्राईव्हवर वनपीस घालून...

SCROLL FOR NEXT