World Cup 2023 Australia Players Injured News 
क्रीडा

World Cup 2023 : वर्ल्डकपपूर्वी दुखापतींमुळे वाढली संघाची डोकेदुखी! कर्णधारसह 4 प्रमुख खेळाडू दौऱ्यातून बाहेर

Kiran Mahanavar

World Cup 2023 Australia Players Injured News : वर्ल्डकप 2023 साठी आता फक्त काही महिने उरले आहेत. आयसीसी ट्रॉफी 5 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. फायनल 19 नोव्हेंबरला होणार आहे. संपूर्ण स्पर्धा प्रथमच भारतात खेळवली जाणार आहे.

ऑस्ट्रेलियाने 5 वेळा विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे, मात्र यावेळी मोठ्या स्पर्धेपूर्वी संघासाठी वाईट बातमी येत आहे. अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. दुखापत झालेला तो संघातील चौथा महत्त्वाचा खेळाडू आहे.

याआधी कर्णधार कॅप्टन पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ हे देखील दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर गेले आहेत.

ग्लेन मॅक्सवेलच्या जागी मॅथ्यू वेडचा टी-20 संघात समावेश करण्यात आला आहे. डर्बनमध्ये संघाच्या पहिल्या सराव सत्रादरम्यान मॅक्सवेलला दुखापत झाली होती. त्याच्या दुखापतीमुळे विश्वचषकापूर्वी संघ व्यवस्थापनाची चिंता वाढली होती. त्याने यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका खेळण्यास नकार दिला होता. यादरम्यान, तो पहिल्यांदाच वडील होणार असून कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी त्याने ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांची टी-20 मालिका 30 ऑगस्टपासून सुरू होत आहे. यानंतर 7 सप्टेंबरपासून उभय संघांमध्ये 5 सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळवली जाणार आहे.

याआधी स्टीव्ह स्मिथ आणि पॅट कमिन्स हे देखील फ्रॅक्चरमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडले होते. कारकिर्दीत दुखापतीमुळे त्रस्त असलेला मिचेल स्टार्क ऍशेस मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार नाही. विश्वचषकापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 सप्टेंबरपासून 3 सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT