क्रीडा

World Cup 2023:वंदे मातरम..! २०११ च्या विश्वचषकात घडलेली घटना पुन्हा घडली, स्टेडियममध्ये अंधार झाला अन्...

भारत आणि अफगाणिस्तामध्ये सामना सुरु असताना अशी घटना घडली, जिने २०११च्या विश्वचषकाच्या आठवणी ताज्या केल्या.

Manoj Bhalerao

World Cup 2023 : २०२३च्या विश्वचषक स्पर्धेत बुधवारी (दि. ११ ऑक्टोबर) भारत आणि अफगाणिस्तान हे संघ एकमेकांना भिडले. या सामन्यात भारताने अफगाणिस्तावर ८ गडी राखून विजय मिळवला. यात रोहित शर्माने शतक तर झळकावलंच, पण त्याबरोबर अनेक विक्रमही मोडून काढले. या सामन्यात अशी एक घटना घडली, जी बघून प्रत्येक भारतीयाच्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही.

भारतीय संघ फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. इशान किशन आणि रोहित शर्माची फटकेबाजी सुरु होती. भारताचा विजय जवळपास निश्चितच होता. तितक्यात स्टेडीअममध्ये काळाकुट्ट अंधार होतो आणि एक गाणं एकासुरात प्रेक्षक गायला लागतात. ते गाणं म्हणजे, मां तुझे सलाम.

हे गाणं गात असताना चाहत्यांनी आपला फोन बाहेर काढलेला होता आणि टॉर्च चालू करुन हात वर केलेला होता. हा नजारा पाहून प्रत्येक भारतीला शहारा आल्याशिवाय राहणार नाही.

२०११च्या विश्वचषकात देखील अशीच एक घटना घडली होती. महेंद्र सिंह धोनी फलंदाजी कऱत असताना प्रेक्षकांनी अचानक 'मा तुझे सलाम' गाणं गायला सुरुवात केली होती. एका मुलाखतीत धोनीने सांगितले होते की हा त्याच्या आयुष्यातील विस्मरणीय क्षण होता. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT