Sourav Ganguly BCCI vs CAB esakal
क्रीडा

Sourav Ganguly BCCI vs CAB : बंगाल क्रिकेट बोर्डानं घेतला बीसीसीआयशी पंगा? सौरव गांगुली म्हणतो...

अनिरुद्ध संकपाळ

Sourav Ganguly BCCI vs CAB : भारतात 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ड्कप सुरू होत आहे. यासाठी बीसीसीआय आणि वर्ल्डकपचे सामने होणाऱ्या राज्य संघटनांनी देखील कंबर कसली आहे. मात्र या दरम्यान, कोलकाता बंगाल क्रिकेट बोर्डाने घेतलेल्या एका निर्णयामुळे बीसीसीआय नाराज झाली आहे असा दावा द टेलिग्राफने केला आहे.

बंगाल क्रिकेट बोर्डाने वर्ल्डकप 2023 चे इडन गार्डनवर होणाऱ्या सामन्यांसाठीचे तिकीट दर हे बीसीसीआयला न विचारताच जाहीर केले. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये कोलकाता देखील काही सामने होस्ट करणार आहेत.

या संपूर्ण प्रकरणावर बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने देखील आपले मत व्यक्त केले.

द टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने इडन गार्डनला सोमवारी भेट दिली होती. त्यावेळी त्याने तेथे 2 तास घालवले. यावेळी त्याला बीसीसीआय आणि बंगाल क्रिकेट असोसिएशन यांच्यातील वादाबाबत विचारण्यात आले. त्यावेळी त्याने, 'हा विषय पूर्णपणे क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या अधिकारक्षेत्रात येतो. ते त्याबाबत निर्णय घेतील.'

दरम्यान, सीएबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने द टेलिग्राफला सांगितले की सौरव गांगुलीने इडन गार्डनवरील नुतनीकरणाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी भेट दिली आहे.

सीएबीला विश्वास आहे की ते वर्ल्डकपसाठीचे तिकीट दर बदलायचे की तेच ठेवायचे याच्यावर लवकरच तोडगा काढतील. सध्या तरी वर्ल्डकपच्या सामन्यांच्या तिकीटांबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सामन्यांचे तिकीट हे जुलैच्या पहिला आठवड्यात जाहीर होण्याची अपेक्षा होती. मात्र बीसीसीआय आणि आयसीसी अजूनही वितरण प्रक्रियेवर काम करत आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

SCROLL FOR NEXT