World Cup 2023 sakal
क्रीडा

World Cup 2023 : भारत उपांत्य फेरीत; श्रीलंकेवर ३०२ धावांनी विक्रमी विजय

शुभमन गिल (९२ धावा), विराट कोहली (८८ धावा), श्रेयस अय्यर (८२ धावा) यांच्या धडाकेबाज

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - यजमान भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या लढतीत श्रीलंकेचा ३०२ धावांनी धुव्वा उडविला आणि रुबाबात एकदिवसीय विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.

टीम इंडियाने विश्‍वकरंडकातील विक्रमी विजयाला गवसणी घातली आहे. भारताचा हा विश्‍वकरंडकातील सर्वाधिक धावांनी मिळविलेला विजय ठरला. भारताने साखळी फेरीतील सातही लढती जिंकल्या असून आता दक्षिण आफ्रिका व नेदरलँड्‌स यांच्याविरुद्धचे सामने बाकी आहेत.

शुभमन गिल (९२ धावा), विराट कोहली (८८ धावा), श्रेयस अय्यर (८२ धावा) यांच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या जोरावर भारतीय संघाने आठ बाद ३५७ धावांचा डोंगर उभारला. कोहली व गिल यांनी मिळालेल्या जीवनदानाचा फायदा घेत श्रीलंकेच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. ३५८ धावांच्या ओझ्याखाली श्रीलंकेच्या संघातील फलंदाजांना निभाव लागला नाही.

जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज व मोहम्मद शमी या वेगवान त्रिकुटाच्या प्रभावी कामगिरीसमोर त्यांचा डाव १९.४ षटकांत ५५ धावांवरच गडगडला. फक्त तीनच खेळाडूंना दोन आकडी धावसंख्या करता आली. शमीने १८ धावा देत श्रीलंकेचा निम्मा संघ गारद केला. सिराजने १६ धाव देत तीन फलंदाज बाद केले. श्रीलंकेच्या संघाचा विश्‍वकरंडकातील हा नीचांक ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT