World Cup 2023 Century  esakal
क्रीडा

World Cup 2023 : सामन्यांपेक्षा शतकंच जास्त! भारतातील वर्ल्डकपमध्ये चाललयं तरी काय?

अनिरुद्ध संकपाळ

World Cup 2023 Century : भारतात वनडे वर्ल्डकप होणार म्हटल्यावर जगभरातील फिरकी गोलंदाजांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं होतं. मात्र भारतातील खेळपट्ट्यांनी सुरूवातीच्या टप्प्यात तरी आपलं दान हे फलंदाजांच्या पारड्यात टाकलं आहे. काही तुरळक लो स्कोरिंग सामने सोडले तर प्रत्येक सामन्यात 300 पेक्षा जास्त धावा होत आहेत आणि तेवढ्याच जवळापस चेस देखील होत आहेत.

आजच्या दक्षिण आफ्रिका विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात देखील धावांचा पाऊस पडला. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 311 धावा ठोकल्या. क्विंटन डिकॉकने 106 धावांची शतकी खेळी केली. ही त्यांची यंदाच्या वर्ल्डकपमधील दुसरी शतकी खेळी आहे.

विशेष म्हणजे यंदाच्या वर्ल्डकपमध्ये शतकांचा महापूर आला आहे. आतापर्यंत वर्ल्डकप 2023 मध्ये 10 सामने खेळले गेले आहेत. त्यात तब्बल 12 शतकी खेळी झाल्या आहेत. वर्ल्डकपच्या सुरूवातीच्या फेजमध्ये सर्वात जास्त शतकी खेळी करण्यात दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज आघाडीवर आहेत.

यात क्विंटन डिकॉकच्या 2 तर दुसेन आणि माक्ररम यांनी एक एक शतक ठोकले आहे. न्यूझीलंडच्या डेवॉन कॉन्वे आणि रचिन रविंद्र यांनी पहिल्याच सामन्यात शतकी धमाका केला होता.

याचबरोबर श्रीलंकेच्या मेंडीस यांनी सदीरा यांनी देखील शतक ठोकले आहे. पाकिस्तानकडून अब्दुल्ला शफिक, मोहम्मद रिझवान यांनी देखील शतके ठोकली. इंग्लंडकडून डेव्हिड मलान, भारताकडून रोहित शर्मा यांनी शतक पूर्ण करत वर्ल्डकपमध्ये धडाकेबाज सुरूवात केली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

IPL मध्ये कॅप्टनला जाब विचारला जातो...केएल राहुलचा LSG चे मालक गोयंकांवर अप्रत्यक्ष निशाणा?

Horoscope Marathi : कुणाला होणार धनलाभ तर कुणाला मोठा तोटा! कसा असेल तुमचा उद्याचा दिवस? पाहा मेष ते मीन सर्व राशींचे राशीभविष्य

Kolhapur News: कोल्हापूरमध्ये कुष्ठरोगाविरुद्ध मोठी मोहीम सुरू; ३५ लाखांहून अधिक लोकांची घरोगरी तपासणी, प्रशासनाचा सर्वांना सहकार्याचा आग्रह

IND vs SA : 'तुमचा बँक बॅलन्स वाढवत राहा...' कोलकाता कसोटीनंतर पीटरसन संतापला; खेळाडूंसह क्रिकेट बोर्डालाही झापलं

SCROLL FOR NEXT