World Cup 2023 Jay Shah delighted after tournament garners record viewership ind vs aus final sakal
क्रीडा

World Cup 2023 : वर्ल्ड कप हुकला पण... क्रिकेट चाहत्यांनी इतिहास रचला! फायनल मॅचने टीव्ही दर्शकांचे तोडले रेकॉर्ड

Kiran Mahanavar

World Cup 2023 : वर्ल्ड कप 2032 च्या अंतिम फेरीतील पराभव पचवण्याचा प्रयत्न अजून पण क्रिकेट चाहते करत आहेत. मात्र, 2023 चा वर्ल्ड कप अनेक अर्थांनी संस्मरणीय ठरला आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवरील वर्ल्ड कप सामन्याने अनेक विक्रम रचले.

त्याच वेळी, वर्ल्ड कपने टीव्हीवरील दर्शकांचे अनेक विक्रम मोडले आहेत. वर्ल्ड कप फायनलनेही हाच ट्रेंड पुढे नेला आणि 30 कोटी लोकांनी तो टीव्हीवर पाहिला. अशा परिस्थितीत ही सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा ठरली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करून याची पुष्टी केली आहे.

बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ट्विट करून लिहिले की, '30 कोटी क्रिकेट चाहत्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप 2023 चा फायनल टीव्हीवर पाहिला. भारतीय टीव्ही इतिहासातील कोणत्याही प्रकारचा हा सर्वात जास्त पाहिला जाणारा सामना आहे. सर्वाधिक 13 कोटी प्रेक्षकांनी एकाच वेळी वर्ल्ड कप फायनल टीव्हीवर पाहिला. डिजिटलमध्ये हा दर्शकांचा आकडा 5.9 कोटी होता. हा एक जागतिक विक्रम आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांचे आमच्या खेळाबद्दलचे प्रेम आणि उत्कटता पाहून आम्ही पुन्हा एकदा भारावून गेलो आहोत. टीम इंडियाला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार....

भारतीय संघ सलग 10 सामने जिंकून वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. ट्रॉफी उचलण्यासाठी ते फेव्हरेट होते, परंतु संघ अंतिम अडथळा दूर करू शकला नाही. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकला. 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 मध्येही तो चॅम्पियन बनला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Probable Ministers List : नितीशकुमार यांच्या नवीन मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची यादी आली समोर!

Pune Election 2025 : निवडणुकीच्या रिंगणातून माघार! पहिल्या दिवशी लोणावळ्यात नगराध्यक्ष, तर जिल्ह्यातून १४ सदस्य उमेदवारांनी अर्ज मागे घेतले

Latest Marathi News Update LIVE: शालार्थ आयडी घोटाळ्यात तीन लिपीक गजाआड

Jasprit Bumrah And Hardik Pandya: वनडे मालिकेमधून हार्दिक, बुमराची माघार? टी-२० विश्‍वकरंडकाला प्राधान्य; आयपीएलनंतर वनडेकडे लक्ष

Health News : ससून, जे. जे. रुग्णालयांतील सेवा कंपन्यांकडे; 'पीपीपी'मुळे सरकारी आरोग्य सेवा धोक्यात- २१ डिसेंबरला मुंबईत मोठे आंदोलन

SCROLL FOR NEXT