World Cup 2023 Sakal
क्रीडा

World Cup 2023 : विश्वकरंडक स्पर्धेत विजेतेपदासाठी भारतीय संघाला कपिलदेव यांचा मोलाचा सल्ला, "दडपणाचे ओझे.. "

भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाला विजेतेपदासाठी अधिक पसंती दिली जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर - घरच्या मैदानावर पुन्हा एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळवायचे असेल, तर भारतीय संघाला प्रथम दडपणांचे ओझे कमी करावे लागेल, असे मत विश्वविजेते माजी कर्णधार कपिलदेव यांनी व्यक्त केले.

भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाला विजेतेपदासाठी अधिक पसंती दिली जात आहे.

भारतीय संघ या स्पर्धेकडे कशा दिशेने जाणार आहे, त्यासाठी त्यांचा रस्ता कसा असेल, हे आपल्याला माहीत नाही, अजून संघ जाहीर व्हायचा आहे; पण भारतीय संघाकडे नेहमीच संभाव्य विजेते म्हणून पाहिले जाते, असे कपिलदेव यांनी म्हटले आहे.

घरच्या मैदानावर अशा महत्त्वाच्या स्पर्धांत मोठे यश मिळवायचे असेल, तर प्रथम चारही बाजूंनी येणाऱ्या अपेक्षांच्या दडपणाचा सामना करावा लागतो.

आपण घरच्या मैदानावर एक विश्वकरंडक जिंकलेला आहे. या वेळीही तशी संधी असेल. ज्या खेळाडूंना संधी मिळेल, ते करंडक उंचावतील, अशी अपेक्षा कपिलदेव यांनी व्यक्त केली.

१३१ कसोटी आणि २२५ एकदिवसीय सामने खेळलेले कपिलदेव वेगवान गोलंदाज असूनही यांनी दुखापतींमुळे कारकिर्दीत एकही ब्रेक घेतला नव्हता; पण आधुनिक युगातील सध्याचे क्रिकेटपटू वारंवार दुखापतग्रस्त होत असताना त्यांना सातत्याने फिटनेसचा प्रश्न येत असतो.

भारतीय संघाचा हुकमी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा अशाच प्रकारे वर्षभर संघाबाहेर आहे. जेवढ्या प्रमाणात क्रिकेट खेळले जाते, तेवढ्या प्रमाणात त्यांची काळजी घेतली जात नाही, असे कपिलदेव यांनी म्हटले आहे.

आमचा काळ वेगळा होता. त्या वेळी सातत्याने फार कमी वेळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळायची. आता तर वर्षातील १० महिने हे खेळाडू खेळतच असतात अशा परिस्थितीत दुखापतीतून मुक्त राहण्यासाठी शरीरावर किती ताण पडतोय, याचे जाण ठेवणे महत्त्वाचे आहे.

प्रत्येकाची शरीरक्षमता वेगळी असते, त्यामुळे प्रत्येकाची वेगवेगळी तयारी असू शकते, असे कपिलदेव यांनी सांगितले.

एकेकाळी सर्वात बलाढ्य असलेला वेस्ट इंडिजचा संघ भारतातील या विश्वकरंडक स्पर्धेस पात्र ठरलेला नाही, याबाबत विचारले असता कपिल म्हणाले, विश्वकरंडक स्पर्धेत वेस्ट इंडिजचा संघ नाही,

हा विचारही वेदना देणारा आहे, त्यांची एवढी अधोगती कशामुळे झालीय, हे मला माहीत नाही; पण लवकरच ते पुन्हा यशाच्या मार्गावर येतील, अशी अपेक्षा करुया.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT