world cup 2023 last match will be played in Pune today Australia vs Bangladesh sakal
क्रीडा

World Cup 2023 : पुण्यात आज रंगणार शेवटचा सामना! ऑस्ट्रेलियाचे लक्ष्य सलग सातव्या विजयावर तर बांगलादेश...

सकाळ ऑनलाईन टीम

World Cup 2023 Australia vs Bangladesh : सर्वाधिक पाच वेळा विश्‍वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने यंदा भारतात सुरू असलेल्या एकदिवसीय विश्‍वकरंडकात सलग सहा लढतींमध्ये विजय मिळवून अगदी रुबाबात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता आज त्यांना अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत बांगलादेशचा सामना करावयाचा आहे. जो पुण्यातील गहुंजे येथील स्टेडिअवर वर्ल्ड कपचा शेवटचा सामना असणार आहे.

सलग सातव्या विजयाला गवसणी घालून आत्मविश्‍वासाने उपांत्य फेरीला सामोरे जाण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने कंबर कसली असेल. बांगलादेश संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे, पण चॅम्पियन्स करंडकाची पात्रता मिळवण्यासाठी, तसेच प्रतिष्ठा राखण्यासाठी त्यांना ऑस्ट्रेलियाला हरवणे गरजेचे आहे.

ग्लेन मॅक्सवेलच्या नाबाद २०१ धावांच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला आणि अंतिम चारमध्ये प्रवेश केला. या देदीप्यमान खेळीदरम्यान मॅक्सवेलच्या पायाला दुखापत झाली. बांगलादेशविरुद्धच्या लढतीत तो खेळणार की नाही. याबाबत सध्या तरी अनिश्‍चितता आहे.

ऑस्ट्रेलियाचे गोलंदाजी प्रशिक्षक डॅनियल व्हेट्टोरी याप्रसंगी म्हणाले, ग्लेन मॅक्सवेल मागील दोन दिवसांमध्ये बरा होत आहे, पण बांगलादेशविरुद्धच्या लढतीत त्याला खेळवायचे की नाही याबाबतचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. याप्रसंगी कोलकता येथे होणार असलेल्या उपांत्य फेरीकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. दरम्यान, मॅक्सवेलला आजच्या लढतीत विश्रांती देण्यात येण्याची दाट शक्यता आहे.

ॲडम झॅम्पा ठरतोय प्रभावी

ऑस्ट्रेलियन संघाला पहिल्या दोन लढतींत पराभवाचा सामना करावा लागला. या दोन्ही लढतींत ॲडम झॅम्पा या फिरकी गोलंदाजालाही अपयश आले, पण त्यानंतर झॅम्पाने प्रभावी कामगिरी केली. त्याने आठ सामन्यांमधून २० फलंदाज बाद केले आहेत. त्याने ५.५६ च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या असून १९.२० च्या सरासरीने फलंदाज बाद केले आहेत. त्यामुळे बांगलादेशच्या फलंदाजांना त्याचे आव्हान थोपवून लावावे लागणार आहे.

कांगारूंचे वर्चस्व

ऑस्ट्रेलिया-बांगलादेश यांच्यामध्ये आतापर्यंत २१ एकदिवसीय लढती पार पडल्या आहेत. यापैकी १९ लढतींमध्ये ऑस्ट्रेलियाने विजय साकारला आहे. बांगलादेशला फक्त एकाच लढतीत विजय मिळवता आला आहे. दोन देशांमध्ये झालेल्या लढतींच्या निकालावर दृष्टिक्षेप टाकल्यास कांगारूंचे निर्विवादपणे वर्चस्व दिसून येत आहे.

शाकीबविना खेळणार

बांगलादेशचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत कर्णधार शाकीब उल हसनच्या अनुपस्थितीत मैदानात उतरणार आहे. दुखापतीमुळे त्याला या लढतीत खेळता येणार नाही. त्यामुळे बांगलादेशचा गोलंदाजी विभाग थोडा कमकुवत होईल. इंग्लंडप्रमाणे बांगलादेशसाठीही चॅम्पियन्स क्रिकेट करंडकाची पात्रता पणाला लागली आहे. त्यांनाही अव्वल सात देशांच्या क्रमवारीत यायचे आहे. आठ क्रमांकाच्या खाली घसरण झाल्यास त्यांनाही चॅम्पियन्स करंडकात सहभागी होता येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

Navi Mumbai : APMC मार्केटजवळ भीषण आग, १० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पो जळून खाक

Bus-Car Accident : कोल्हापुरातून महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत चौघे ठार, एक जण जखमी

Panchang 7 July 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

SCROLL FOR NEXT