Narendra Modi Stadium ahmedabad-hotel-room-rates-hike-after-icc wc schedule announcement  
क्रीडा

World Cup 2023: मोदींच्या अहमदाबादमधील हॉटेल रूमच्या किंमती भिडल्या गगनाला! जाणुन घ्या एका रात्रीचे भाडे

Kiran Mahanavar

Ahmedabad Hotel Room Rates : आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 चे वेळापत्रक येताच मोदींच्या अहमदाबादमधील हॉटेल रूमच्या किंमती गगनाला भिडल्या. अहमदाबादमधील हॉटेलच्या खोलीचे भाडे इतके वाढले आहे, की ऐकून सर्वांनाच धक्का बसेल. ICC 2023 एकदिवसीय विश्वचषक 5 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि अंतिम सामना 19 नोव्हेंबरला खेळल्या जाणार आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 15 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महान सामना रंगणार आहे. आयसीसी 2023 एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामनाही नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे.

क्रिकेट विश्वचषक 2023चे वेळापत्रक येताच अचानक अहमदाबादमधील हॉटेलच्या खोलीचे भाडे गगनाला भिडले. विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आणि अंतिम सामन्याचे आयोजन यामुळे अहमदाबादच्या हॉटेल्समध्ये बुकिंग सुरू झाले आहे. विश्वचषक 2023 सुरू होण्यासाठी अजून 4 महिने बाकी आहेत.

विश्वचषक 2023 दरम्यान देश-विदेशातील लोक क्रिकेट पाहण्यासाठी अहमदाबादमध्ये येतील, अशा परिस्थितीत येथील अनेक हॉटेल्सचे एका रात्रीचे भाडे 50 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. सामान्य दिवसांमध्ये, या खोल्यांची किंमत प्रति रात्र 6,500 ते 10,500 रुपयांपर्यंत असते.

या स्पर्धेची सुरुवात अहमदाबादमध्येच 5 ऑक्टोबरला मागील विजेते इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने होईल. नरेंद्र मोदी स्टेडियम हे प्रेक्षकांच्या संख्येनुसार जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे, जे 132000 प्रेक्षक बसू शकतात, जे मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) पेक्षा 32000 जास्त आहे.

विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आणि दुसरा सामना दुसऱ्या दिवशी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. दोन्ही उपांत्य फेरीत राखीव दिवस असेल. अंतिम सामना अहमदाबादमध्ये 19 नोव्हेंबरला होईल तर 20 नोव्हेंबर हा राखीव दिवस असेल. यजमान भारत 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे पाच वेळा विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.

हैदराबाद, अहमदाबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बेंगळुरू, मुंबई आणि कोलकाता येथे वर्ल्डकपचे सामने होणार आहेत. गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम व्यतिरिक्त हैदराबादमध्ये 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान सराव सामने खेळवले जातील. 2011 च्या विश्वचषकाचा अंतिम सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. जिथे भारताने 28 वर्षांनी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले. त्याच वेळी 1987 च्या विश्वचषकाचा अंतिम सामना ईडन गार्डन्सवर खेळला गेला ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला पराभूत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ration Card : रेशनकार्डमधून १.१७ कोटी लोकांची नावे वगळणार, केंद्राने राज्यांना पाठवली यादी; तुमचं नाव तर नाही ना ?

Pune Traffic : सिंहगड रस्तावासीयांना पुन्हा मनस्ताप; पाऊस, प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे वाहतूक कोंडी

Rain-Maharashtra Latest live news update: नागपूर जिल्ह्यातील वडगाव धरण 99.75 टक्के भरले, 953.57 क्युमेक ने पाण्याचा विसर्ग सुरू

SET Exam 2025 : विद्यार्थ्यांची चिंता वाढली; सेट परीक्षेचा निकाल एसबीसी आरक्षणामुळे रखडला

Monsoon Car Tips: कारच्या एसीचा दुर्गंध घालवण्यासाठी पावसाळ्यात 'या' 4 गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT