क्रीडा

World Cup 2023 : न्यूझीलंडचे एका दगडात दोन पक्षी! स्वतः उपांत्य फेरीत; पाकिस्तान जवळपास बाहेर...

सकाळ ऑनलाईन टीम

World Cup 2023 semi-finals Qualification Scenario : न्यूझीलंडने श्रीलंकेवर मोठा विजय मिळवत विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी जवळपास निश्चित केली. त्यामुळे कुंपणावर असलेल्या पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आल्यातच जमा आहे.

सलग चार विजय आणि त्यानंतर सलग चार पराभव, त्यामुळे अडचणीत सापडलेल्या न्यूझीलंडला आज विजय आवश्यक तर होताच; पण पाकला शर्यतीत येऊ न देण्यासाठी मोठा विजय आवश्यक होता. या दोन्ही गोष्टी त्यांनी श्रीलंकेवर ५ विकेट आणि १६० चेंडू राखून साध्य केल्या. या सामन्यावर पावसाचे सावट होते; परंतु एकही सर आली नाही, मात्र न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी श्रीलंकेला १७१ धावांत गुंडाळ्यानंतर धावांचा पाऊस पाडला. कॉनवे (४५) आणि राचिन रवींद्र (४२) यांनी सात धावांच्या सरासरीने ८६ धावांची सलामी देऊन मोठा विजयाचा पाया रचला.

पाकविरुद्धच्या सामन्यात ४०० धावा करूनही केवळ पावसामुळे आव्हान कमी झाल्याने सर्व गणित बिघडल्याच्या अनुभवावरून आज न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि दुसऱ्याच षटकात पहिले यश मिळवले. श्रीलंकेचा कर्णधार कुशल मेंडीस आणि समरविक्रमा यांना बोल्टने एकाच षटकात बाद केले तेव्हा श्रीलंकेची अवस्था ३ बाद ३२ अशी झाली होती. पहिल्याच षटकात शून्यावर जीवदान मिळालेल्या कुशल परेराच्या मनात मात्र काही वेगळेच होते.

तुफान टोलेबाजी करत त्याने या विश्वकरंडक स्पर्धेतले सर्वात वेगवान अर्धशतक केले. फलंदाजी किती बाद झाले, याची चिंता करण्यापेक्षा तो आक्रमण करत राहिला; मात्र संघाच्या ७० या धावसंख्येवर श्रीलंकेने त्याच्यासह चरिथ असलंका यांना गमावले आणि तेथेच त्यांच्या धावसंख्येला ब्रेक लागला. त्यानंतर अँजेलो मॅथ्यूज आणि धनंजय डिसिल्व्हापाठोपाठ माघारी फिरले. ७ बाद १०५ अशा संकटात सापडलेल्या श्रीलंकेची पुढे ९ बाद १२८ अशी दारुण अवस्था झाली. महिष तिक्शाना आणि दिलशान मधुशंका या अखेरच्या जोडीने हार मानली नव्हती. तब्बल ८७ चेंडू किल्ला लढवत त्यांनी ४३ धावांची भागीदारी केली. त्यामुळे लंकेला १७१ धावांपर्यंत मजल मारता आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT