World Cup 2023 Devon Conway  esakal
क्रीडा

World Cup 2023 : न्यूझीलंड जिंकणार यंदाचा वर्ल्डकप... कॉन्वेच्या शतकानं योगायोग तरी आलाय जुळून

विश्वचषक २०२३: New Zealand will win this year's World Cup...

अनिरुद्ध संकपाळ

World Cup 2023 Devon Conway :

आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 च्या पहिल्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडचा न्यूझीलंडने पराभव केला. इंग्लंडने 283 धावांचे आव्हान न्यूझीलंडने एका फलंदाजाच्या मोबदल्या 36.2 षटकातच पार केले. न्यूझीलंडकडून सलामीवीर डेवॉन कॉन्वेने दमदार 152 धावांची नाबाद दीडशतकी खेळी केली. तर रचिन रविंद्रने नाबाद 123 धावा करत आपल्या पहिल्याच वर्ल्डकप सामन्यात शतकी धमाका केला.

न्यूझीलंडने इंग्लंडचे टाग्रेट हे 36.2 षटकातच पार केले. या सामन्यात कॉन्वेने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी केली. याचबरोबर तो यंदाच्या वर्ल्डकपमध्ये शतकी खेळी करणारा पहिला फलंदाज ठरला. रचिन देखील वर्ल्डकपमध्ये शतक ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. मात्र कॉन्वेच्या शतकाचा एक अजब योगायोग आहे. यानुसार न्यूझीलंड यंदाचा वर्ल्ड चॅम्पियन ठरण्याची शक्यता आहे.

काय आहे हा योगायोग?

वनडे वर्ल्डकप 2023 मधले पहिले हे कॉन्वेने शतक ठोकले. जर आपण गेल्या काही वर्ल्डकपवर नजर टाकली तर 2007 च्या वर्ल्डकपमध्ये पहिले शतक हे ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगने ठोकले होते. त्यावर्षी ऑस्ट्रेलिया वर्ल्ड चॅम्पियन ठरली. त्यानंतर 2011 च्या वर्ल्डकपमध्ये विरेंद्र सेहवागने पहिले शतक ठोकले होते. त्यानंतर भारत विश्वविजेता ठरला होता.

2015 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये एरॉन फिंचने पहिले शतक ठोकले अन् ऑस्ट्रेलिया वर्ल्ड चॅम्पियन झाली. 2019 मध्ये देखील इंग्लंडच्या जो रूटने शतकी खेळी केली होती. त्यानंतर इंग्लंडने पहिल्यांदाच वर्ल्डकपवर नाव कोरले.

2023 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये डेवॉन कॉन्वेने सर्वात पहिल्यांदा शतक ठोकले. त्यामुळे यंदाचा वर्ल्डकप हा न्यूझीलंड जिंकणार का अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू झाली आहे. हा फक्त एक योगायोग आहे. न्यूझीलंड 2019 च्या वर्ल्डकपमध्ये उपविजेती राहिली होती.

फायनल सामना आणि सुपर ओव्हर देखील टाय झाल्याने चेंडू सर्वाधिकवेळा सीमापार धांडणाऱ्या इंग्लंडला विजेतेपद बहाल करण्यात आलं. मात्र यावर्षी पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला मोठ्या फरकाने पराभूत करत वर्ल्डकपवरील आपली दावेदारी सादर केली.

(World Cup 2023 Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT