World Cup 2023 esakal
क्रीडा

World Cup 2023 : पाकिस्तान संघाचं मुर्दाबादच्या घोषणेनं झालं स्वागत; सोशल मीडियावरील Video चं काय आहे सत्य?

अनिरुद्ध संकपाळ

World Cup 2023 : भारतात येत्या 5 ऑक्टोबरपासून 13 व्या वनडे वर्ल्डकपला सुरूवात होत आहे. यासाठी भारतीय संघाचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा संघ नुकताच भारतात दाखल झाला. तब्बल 7 वर्षानंतर पाकिस्तानी संघ भारतात आला आहे. दरम्यान सोशल मीडियावर पाकिस्तानच्या संघाबाबतचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

बुधवारी पाकिस्तानी संघ हैदराबादच्या विमानतळावर दाखल झाल्यानंतर कडक सुरक्षाव्यवस्थेत त्यांना हॉटेलकडे रवाना करण्यात आले. दरम्यान एका व्हिडिओत दावा केला जात आहे की यावेळी पाकिस्तान मुर्दाबादचे नारे देण्यात आले.

खरं काय आहे?

पाकिस्तानी संघ ज्यावेळी भारतात दाखल झाला त्यावेळी अनेक माध्यम संस्थांचे प्रतिनिधी तेथे उपस्थित होते. या माध्यम संस्थांच्या वृत्तानुसार ज्यावेळी पाकिस्तानचा संघ भारतात दाखल झाला त्यावेळी त्यांचे चाहत्यांनी उत्साहात स्वागत केले.

ट्विटरवर एएनआय या वृत्तसंस्थेने एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ आणि मुर्दाबादचे नारे लागल्याचा दावा केलेला व्हिडिओ हा मिळताजुळता आहे. या दोन्ही व्हिडिओचा ऑडियो मात्र वेगळा आहे. एएनआयच्या व्हिडिओत लोकांचा आवाज येतोय, लोकं फोटो काढताना दिसत आहे. या व्हिडिओतील आवाज आणि व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील आवाज हा वेगळा आहे.

विशेष म्हणजे दोन्ही व्हिडिओत पाकिस्तानी खेळाडू हे हसताना दिसत आहेत. त्यांच्या आसपासचे सुरक्षा कर्मचारी देखील हसत आहेत. यावरून तेथे कोणतेही तणावपूर्ण वातावरण नसल्याचे जाणवते. त्यामुळे व्हायरल व्हिडिओतील ऑडियो हा एडिट करून नंतर जोडण्यात आला आहे.

पाकिस्तानचा संघ वर्ल्डकपमध्ये आपला पहिला सामना हा 6 ऑक्टोबरला नेदरलँडविरूद्ध खेळणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडविरूद्ध 29 सप्टेंबरला तर ऑस्ट्रेलियाविरूद्ध 3 ऑक्टोबरला सराव सामना खेळणार आहे.

(Cricket Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT