World Cup 2023 India Vs Pakistan esakal
क्रीडा

World Cup 2023 : चेन्नईत खेळायला पाकिस्तान घाबरतंय? अश्विन म्हणाला मला शंका आहे की...

अनिरुद्ध संकपाळ

World Cup 2023 India Vs Pakistan : भारतात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्डकपचे शेड्युल अजून जाहीर झालेले नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हा भारतातील व्हेन्यूवरून नखरे करत आहे. बीसीसीआयने आयसीसीकडे वर्ल्डकपचे संभाव्य वेळापत्रक आणि सामन्याची ठिकाणे यांची यादी दिली आहे. मात्र यावर पाकिस्तानने आक्षेप घेतला आहे.

पाकिस्तानचा भारतासोबतचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. आधी पाकिस्तानने याबाबत आक्षेप घेत सुरक्षेच्या कारणास्तव सामना इथून हलवण्याची मागणी केली. यानंतर आता पाकिस्तानने अफगाणिस्तानविरूद्धचा चेन्नईतील सामना देखील याच कारणास्तव हलवण्याची मागणी केली आहे. मात्र आयसीसी आणि बीसीसीआयने याला नकार दिला आहे.

पाकिस्तानने चेन्नईतील अफगाणिस्तानविरूद्धचा सामना बंगळुरात आणि बंगळुरूमधील ऑस्ट्रेलियाविरूद्धचा सामना हा चेन्नईत खेळवण्यात यावा अशी मागणी केली आहे. याबाबतचे वृत्त माध्यमात आले आहे. पीसीबीने या दोन व्हेन्यूची अदलाबदली करण्यात यावी अशी विनंती केली आहे. यामागे चेन्नईतील फिरकीला साथ देणारी खेळपट्टी असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. अश्विन म्हणाला की, 'पाकिस्तानने आपल्या पत्रात लिहिले आहे की अफगाणिस्तानसाठी चेन्नईतील परिस्थिती अनुकूल आहे. जर हा सामना बंगळुरूमध्ये खेळवला तर पाकिस्तानला फायदा होईल.'

अश्विन पुढे म्हणाला, 'आयसीसी या विनंतीवर लक्ष देईल की नाही याबाबत माझ्या मनात शंका आहे. पाकिस्तान जर कोणतं वैध कारण देत असते तर व्हेन्यू बदलण्याची शक्यता असती. विशेष म्हणजे फक्त सुरक्षेच्या कारणास्तवच आयसीसी अशा प्रकारच्या विनंतीवर लक्ष देते. 2016 मधील टी 20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील धर्मशाळा येथील सामना कोलकाता येथे शिफ्ट करण्यात आला होता.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT