World Cup 2023 Australia vs England Adam Zampa sakal
क्रीडा

World Cup 2023 : अष्टपैलू कामगिरीनंतर ॲडम झॅम्पा समाधानी! इंग्लंडविरुद्ध लढतीत सामनावीराचा मान

ऑस्ट्रेलियाने शनिवारी रात्री इंग्लंडवर ३३ धावांनी विजय मिळवत एकदिवसीय विश्‍वकरंडकातील उपांत्य फेरीच्या दिशेने दमदार पाऊल टाकले.

सकाळ ऑनलाईन टीम

World Cup 2023 Australia vs England : ऑस्ट्रेलियाने शनिवारी रात्री इंग्लंडवर ३३ धावांनी विजय मिळवत एकदिवसीय विश्‍वकरंडकातील उपांत्य फेरीच्या दिशेने दमदार पाऊल टाकले. कांगारूंच्या या विजयात ॲडम झॅम्पाने अष्टपैलू कामगिरी करीत मोलाचा वाटा उचलला. सुरुवातीला निर्णायक क्षणी २९ धावांची खेळी साकारणाऱ्या झॅम्पाने नंतर २१ धावा देत तीन फलंदाज बाद केले. एक अप्रतिम झेलही टिपला. सामनावीर म्हणून त्याच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर त्याने सर्व बाजूंनी समाधान देणारा सामना ठरला असल्याचे आवर्जून सांगितले.

ॲडम झॅम्पा पुढे म्हणाला, प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास इंग्लंडविरुद्धच्या लढतीतील कामगिरीने मनापासून समाधान मिळाले. मिचेल स्टार्कसोबत महत्त्वपूर्ण भागीदारी करता आली. जास्तीत जास्त षटके फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये यश मिळाले. त्यानंतर डेव्हिड विलीचा झेल घेता आला. अव्वल क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंमध्ये माझे नाव घेतले जात नाही; पण मला तो झेल घेता आला, याचा आनंद आहे.

पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर म्हणाला, सातत्याने होणाऱ्या पराभवांमुळे निराशा वाढत चालली आहे; पण माझ्या संघावरील विश्‍वास कायम आहे. याच संघाने विश्‍वकरंडक पटकावला आहे. हे चॅम्पियन खेळाडू आहेत. तसेच नेतृत्वामुळे माझ्या फलंदाजीवर परिणाम झालेला नाही.

डावखुऱ्या फलंदाजांना गोलंदाजी करण्यात यश

ॲडम झॅम्पा नमूद करतो की, गोलंदाजीत मला छान कामगिरी करता आली. माझ्या १० षटकांमध्ये २१ धावाच देता आल्या. यावरून माझ्या गोलंदाजीचा टप्पा व दिशा योग्य होती हे समजते. तसेच बहुतांशी वेळा डावखुऱ्या गोलंदाजांना गोलंदाजी केली. डेव्हिड मलान, बेन स्टोक्स व मोईन अली या अनुभवी फलंदाजांसमोर प्रभावी कामगिरी करता आली. ऑस्ट्रेलियन संघासाठी योगदान देता आले. याचे समाधान आहे. कसोटी क्रिकेटसाठी अद्याप निवड झालेली नाही; पण माझ्याकडे पुरेसा वेळ आहे. या विश्‍वकरंडकानंतर पुढल्या वर्षी टी-२० विश्‍वकरंडक आहे. त्यासाठी सज्ज व्हायचे आहे, असे तो म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT