World Cup 2023 Schedule  esakal
क्रीडा

World Cup 2023 Schedule : अखेर वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर होण्याचा मुहूर्त ठरला! मुंबईत होणार घोषणा

अनिरुद्ध संकपाळ

World Cup 2023 Schedule : भारतात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्डकपला अवघे काही महिने शिल्लक आहेत. तरी देखील अजून वर्ल्डकपचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झालेले नाही. मात्र आता वर्ल्डकपचे वेळापत्रक कधी जाहीर होणार याची तारीख ठरली आहे. मंगळवारी 27 जूनला मुंबईतून वर्ल्डकप 2023 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. ही तारीख खास आहे कारण इथून पुढे बरोबर 100 दिवसांनी भारतात होणारा वनडे वर्ल्डकप सुरू होईल. वर्ल्डकप येत्या 5 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट बोर्डामध्ये वर्ल्डकपमधील व्हेन्यूवरून वाद झाला होता. बीसीसीआयने आयसीसीकडे संभाव्य वेळापत्रक पाठवले होते. त्यावर आयसीसीने हरकती देखील मागवल्या होत्या.

मात्र पाकिस्तानने त्यावर आक्षेप घेत सुरक्षेच्या कारणास्तव अहमदाबादमधील भारताविरूद्धचा सामना दुसरीकडे खेळवण्याची मागणी केली होती. त्यामुळे हा सामना चेन्नईत खेळवला जाण्याची शक्यता आहे. यानंतर काही दिवसांनी पीसीबीने चेन्नईतील अफगाणिस्ताविरूद्धचा सामना देखील हलवण्याची मागणी केली. त्यामुळे अजून संभ्रम निर्माण झाला.

मिळालेल्या माहितीनुसार आयसीसी आणि बीसीसीआयने देखील पाकिस्तानची ही मागणी धुडकावून लावली आहे. यानंतरही पाकिस्तानची नाटकं कमी झाली नाहीत. पीसीबीचे तत्कालीन चेअरमन नजम सेठी यांनी पाकिस्तानचा संघ भारतात होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये खेळणार की नाही हे ठरवणे आमच्या हातात नसून याबाबतचा निर्णय पाकिस्तानचे सरकार घेणार असे म्हणत पुन्हा एकदा खोडा घालण्याचा प्रयत्न केला.

आता मात्र आयसीसीने पीसीबीची अवास्तव मागणी धुडकावली आहे. त्यामुळे पीसीबीकडून क्लिअरन्स आला की लगेचच आयसीसी वनडे वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर करतील. याची तारीख 27 जून अशी ठरली आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT