WI vs IND ODI Series SAKAL
क्रीडा

WI vs IND ODI Series: मालिका जिंकली तरी रोहित टेन्शनमध्ये, 3 प्रश्ने अजून अनुत्तरितच

Kiran Mahanavar

WI vs IND ODI Series : टीम इंडियाने तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 200 धावांनी पराभव करून मालिका 2-1अशी जिंकली, पण विश्वचषकापूर्वी संघाबाबत अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तर आजुन तरी सापडले नाहीत. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी पुन्हा एकदा बाहेर बसुन संभाव्य खेळाडूंना विश्वचषकासाठी संधी दिली, पण सर्व प्रयोग करूनही संघ संयोजन कामी आलेले दिसत नाही. आतापर्यंत शांत राहिलेल्या शुभमन गिलची बॅट अखेर बोलली आणि त्याने 92 चेंडूत 85 धावा केल्या.

यासोबतच इशान किशन (63 चेंडूत 77 धावा) सोबत 143 धावांची भागीदारीही केली. भारताने प्रथम फलंदाजी करताना पाच विकेट्सवर 351 धावा केल्या होत्या. संजू सॅमसनने 41 चेंडूत 51 धावा करून मधल्या फळीसाठी आपला दावा पक्का केला. कर्णधार हार्दिक पांड्याने 52 चेंडूत पाच षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने नाबाद 70 धावा केल्या. प्रत्युत्तरात कॅरेबियन संघ 35.3 षटकांत 151 धावांतच संपुष्टात आला.

मुकेश कुमारने सात षटकांत 30 धावा देत तीन बळी घेतले. वेस्ट इंडिजसाठी गुडाकेश मोतीने नाबाद 39 आणि अल्झारी जोसेफने 26 धावा केल्या आणि नवव्या विकेटसाठी 55 धावा जोडल्या. शार्दुल ठाकूरने 6.3 षटकात 37 धावा देत चार बळी घेतले. जयदेव उनाडकटला एक आणि कुलदीप यादवने दोन गडी बाद केले. असे असूनही आशिया चषक आणि विश्वचषकापूर्वी अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत.

  • इशानचा फॉर्म, पण केएल राहुल फिट झाला तर?

    इशानची कामगिरी चांगली आहे, पण केएल राहुल फिट असेल तर त्याची फलंदाजी कशी असेल. रोहित शर्मा आपली फलंदाजी इशानसाठी सोडेल, ही शक्यता कमी आहे. मग इशान मधल्या फळीत खेळणार का?

  • श्रेयस, संजू आणि सूर्या कोण?

    श्रेयस अय्यर फिट झाला नाही तर सॅमसन चौथ्या क्रमांकावर उतरू शकतो. मात्र तो काल मोठा डाव खेळण्यात अपयशी ठरला. सूर्यकुमार यादवही 35 धावा करून बाद झाला आणि वनडेत टी-20 फॉर्म दाखवू शकला नाही. श्रेयस आणि राहुल दोघेही तंदुरुस्त झाले तर त्यांना संघात स्थान मिळवणे कठीण होईल.

  • युझवेंद्र चहल आणि मुकेश कुमार यांचे काय होणार?

    गोलंदाजीतही युझवेंद्र चहलला एकाही सामन्यात संधी देण्यात आली नाही. आता विश्वचषकापूर्वी भारताला फक्त नऊ सामने खेळायचे आहेत (जर संघ आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचला तर). रवींद्र जडेजा ही पहिली पसंती फिरकीपटू आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल यांच्यामुळे मुकेश कुमारला जागा मिळणे कठीण होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT