World Cup Points Table After AFG Vs ENG Match : वर्ल्ड कप 2023 ची सुरूवात एकदम कसे थाटात झाली. या वर्ल्ड कपध्ये चाहत्यांना अनेक रोमांचक सामने पाहायला मिळणार आहेत. रविवारी सुद्धा असाच एक रोमांचक सामना पाहायला मिळाला, जेथे अफगाणिस्तानने गतविजेत्या इंग्लंडचा 69 धावांनी पराभव केला. या वर्ल्ड कप मधला हा पहिलाच अपसेट होता.
या पराभवामुळे इंग्लंडच्या उपांत्य फेरीसाठी पात्र होण्याच्या आशांना नक्कीच धक्का बसला आहे. खरं तर हे सांगणे खूप घाईचे होईल कारण संघाचे अद्याप सहा सामने बाकी आहेत आणि येथून जोस बटलरच्या संघाला सर्व सामने जिंकावे लागतील.
यंदाचा वर्ल्डकप 10 संघांमध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवला जात आहे. साखळी फेरीत, एका संघाचा सामना उर्वरित नऊ संघांशी होईल आणि गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेले चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. 2019 मध्येही याच फॉरमॅटमध्ये वर्ल्ड कप खेळला गेला होता आणि त्यावेळी भारत पॉइंट टेबलमध्ये अव्वल होता.
भारताने सात सामने जिंकले होते. अशा स्थितीत इंग्लंडचा आणखी एक-दोन पराभव त्यांच्यासाठी उपांत्य फेरीचा मार्ग कठीण बनवू शकतो. एवढेच नाही तर पॅट कमिन्सच्या ऑस्ट्रेलियन संघावरही हाच धोका निर्माण झाला आहे.
रोहित शर्माचा भारतीय संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत तीनपैकी तीनही सामने जिंकले आहेत. सहा गुण आहेत आणि त्यांचा नेट रन रेट +1.821 आहे. या वर्ल्डकप मध्ये भारताशिवाय केवळ न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांनी एकही सामना गमावलेला नाही. दुसऱ्या स्थानावर न्यूझीलंडचा संघ तीन सामन्यांत तीन विजयांसह आहे. संघाचे सहा गुण आहेत आणि त्याचा नेट रन रेट +1.604 आहे.
दक्षिण आफ्रिकेने दोन सामने खेळले असून दोन सामन्यांत त्यांचे चार गुण आहेत. टेम्बा बावुमाच्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा सध्या +2.360 सह सर्वाधिक नेट रन रेट आहे. बावुमाचा संघ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.
त्याचवेळी बाबर आझमचा पाकिस्तान संघ चौथ्या स्थानावर आहे. त्यांचे तीन सामन्यांतून दोन विजय आणि एक पराभवासह चार गुण आहेत. भारताविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यातील पराभवानंतर संघाचा नेट रन रेट सध्या -0.137 आहे.
अफगाणिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर इंग्लंडचा संघ पहिल्या चार संघांच्या यादीतून बाहेर पडला असून पाचव्या स्थानावर आला आहे. तीन सामन्यांत एक विजय आणि दोन पराभवांसह त्यांचे दोन गुण आहेत. अफगाणिस्तान संघाकडून पराभूत झाल्यानंतर इंग्लिश संघाचा नेट रनरेट आणखी घसरला आहे. ते -0.084 झाले आहे.
अव्वल चारमध्ये येण्यासाठी इंग्लंडला आता येथून सर्व सामने जिंकावे लागतील आणि यानंतरही नेट रनरेटची भूमिका महत्त्वाची असेल. या वर्ल्डकप मध्ये अफगाणिस्तानने इंग्लंडला हरवून विजयाचे खाते उघडले. त्यांच्याकडे तीन सामन्यांतून एक विजय आणि दोन पराभवांसह दोन गुण आहेत. अफगाणिस्तानचा संघ इंग्लंडच्या खालोखाल सहाव्या स्थानावर आहे. त्याचा नेट रन रेट -0.652 आहे. यासोबत बांगलादेश तीन सामन्यांतून एक विजय आणि दोन पराभवांसह दोन गुणांसह सातव्या स्थानावर आहे. त्याचा नेट रन रेट -0.699 आहे.
आठव्या, नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर असलेल्या संघांनी अद्याप आपले विजयाचे खाते उघडलेले नाही. श्रीलंका आठव्या, नेदरलँड्स नवव्या आणि ऑस्ट्रेलिया शेवटच्या म्हणजे दहाव्या स्थानावर आहे. पाच वेळा चॅम्पियन असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीने यावेळी सर्वांनाच चकित केले आहे. संघाने आपले दोन्ही सामने गमावले आहेत. पहिल्या सामन्यात भारताविरुद्ध तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. आता त्याचा सामना आज श्रीलंकेशी होणार आहे. कांगारू संघाला विजयाचे खाते उघडायचे आहे, पण श्रीलंकेने त्यांना हरवले तर संघाला वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याचा धोका आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.