T20 World Cup 2022
T20 World Cup 2022 sakal
क्रीडा

T20 World Cup 2022 : विश्वकरंडकात जडेजाची उणीव भासेल : जयवर्धने

सकाळ वृत्तसेवा

दुबई : आगामी ट्वेन्टी-२० विश्वकरंडकासाठी भारतीय संघात रवींद्र जडेजा दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्यामुळे संघाला त्याचा मोठा धक्का बसला असल्याचे मत श्रीलंकेचा महान फलंदाज महेला जयवर्धने याने व्यक्त केले आहे.

गुडघ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे जडेजाला काही महिने भारतीय क्रिकेट संघापासून लांब राहावे लागणार आहे. उजव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे जडेजा वेस्टइंडीजविरुद्धच्या मालिकेमध्ये खेळू शकला नव्हता. तसेच त्याला आशिया करंडक मध्यातून सोडावा लागला होता. जडेजाच्या दुखापतीबद्दल आयसीसीशी बोलताना जयवर्धने म्हणाला, की ‘‘रवींद्र जडेजा पाचव्या क्रमांकावर येऊन फलंदाजी करतो; तसेच हार्दिक पंड्या सहाव्या क्रमांकावर येऊन फलंदाजी करतो. हे दोघेही अष्टपैलू खेळाडू असल्यामुळे भारतीय संघाला फलंदाजीत बरेच पर्याय उपलब्ध होतात.

डाव्या हाताने फलंदाजी करणारा जडेजा भारतीय संघात नसल्यामुळे संघाला डावखुऱ्या फलंदाजाची उणीव जाणवणार आहे. दिनेश कार्तिकला भारतीय संघात घेण्याऐवजी रिषभ पंतला खेळवले, तर भारतीय संघाला जाणवणाऱ्या डावखुऱ्या फलंदाजांची उणीव भरून निघेल’’ असेही मत जयवर्धने याने मुलाखतीत व्यक्त केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT