world cup u19 cricket match update 9th time in final india vs africa Sakal
क्रीडा

World Cup U19 : नवव्यांदा अंतिम फेरीत पोहोचण्याचे लक्ष्य; भारत-आफ्रिका आज उपांत्य सामना

भारताचा युवा क्रिकेट संघ उद्या १९ वर्षांखालील विश्‍वकरंडकाच्या उपांत्य फेरीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

बेनोनी : भारताचा युवा क्रिकेट संघ उद्या १९ वर्षांखालील विश्‍वकरंडकाच्या उपांत्य फेरीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करणार आहे. गतविजेता व सर्वाधिक पाच वेळा विजेता ठरलेला भारतीय क्रिकेट संघ नवव्यांदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी सज्ज आहे. यंदाच्या मोसमात एकही लढत न गमावलेल्या भारतीय संघाचे पारडे जड आहे.

भारतीय संघाने साखळी फेरीत तीन, तर सुपरसिक्समध्ये दोन लढतींमध्ये विजय मिळवले आहेत. या पाचही लढतींमध्ये प्रतिस्पर्ध्यांवर सहज मात करण्यात त्यांना यश संपादन करता आले आहे. मुशीर खान व उदय सहारन या दोन फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला आहे.

मुशीर याने दोन शतके व एक अर्धशतकासह ३३४ धावा फटकावल्या असून उदय याने एक शतक व दोन अर्धशतकांसह ३०८ धावा फटकावल्या आहेत. सचिन धस याने नेपाळविरुद्धच्या सुपर सिक्स लढतीत ११६ धावांची खेळी साकारत आपली चुणूक दाखवली. गोलंदाजी विभागातही भारतीयांनी प्रभावी कामगिरी केली आहे.

... तर भारत-पाक अंतिम लढत

भारत-पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी यांच्यामध्ये आतापर्यंत या स्पर्धेत लढत झालेली नाही. मात्र जेतेपदाच्या लढतीत हे दोन्ही संघ एकमेकांसमोर येऊ शकणार आहेत. भारताने उपांत्य फेरीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यास आणि पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचे आव्हान परतवून लावल्यास भारत-पाकिस्तानमध्ये अंतिम सामना होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT