सांगलीच्या सचिन खिल्लारीचे सुवर्ण यश कायम; गोळाफेकीत केला आशियाई विक्रम Sakal
क्रीडा

सांगलीच्या सचिन खिल्लारीचे सुवर्ण यश कायम; गोळाफेकीत केला आशियाई विक्रम

भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत पाच सुवर्णपदकांसह ११ पदके जिंकली असून गेल्यावर्षी पॅरिस येथे झालेल्या स्पर्धेत तीन सुवर्ण, चार रौप्य व तीन ब्राँझपदके अशी १० पदके जिंकली होती.

सकाळ वृत्तसेवा

कोबे : महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील करगणी येथील ३४ वर्षीय सचिन खिल्लारीने येथे सुरू असलेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत एफ ४६ गटातील गोळाफेकीत नवीन आशियाई विक्रमासह सुवर्णपदक जिंकताना गेल्यावर्षी जिंकलेले सुवर्णपदक कायम ठेवले. त्याच्या कामगिरीमुळे भारताने जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीही पार केली.

भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत पाच सुवर्णपदकांसह ११ पदके जिंकली असून गेल्यावर्षी पॅरिस येथे झालेल्या स्पर्धेत तीन सुवर्ण, चार रौप्य व तीन ब्राँझपदके अशी १० पदके जिंकली होती. सचिनने पॅरिस येथे सुवर्णपदक जिंकताना १६.२१ मीटरचा आशियाई विक्रम केला होता. हा विक्रम इतिहास जमा करताना त्याने येथे १६.३० मीटर अंतरावर गोळा भिरकावला.

मंगळवारी भारतीय खेळाडूंनी पाच पदकांची कमाई केली होती. सध्या चीन पदकतालिकेत आघाडीवर तर ब्राझील दुसऱ्या स्थानावर आहे. स्पर्धेचे आणखी तीन दिवस शिल्लक असून भारतीय खेळाडूंना आणखी पदके जिंकण्याची संधी आहे.

आम्हाला आणखी दोन सुवर्णपदकांची अपेक्षा असून १७ पदके जिंकण्याची आशा आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक सत्यनारायणन यांनी दिली. मंगळवारी सुमीत अंतिल, थंगवेलू मरियप्पन आणि एकता बिश्त यांनी सुवर्णपदके जिंकली होती.

एफ ४६ म्हणजे काय?

एक किंवा दोन हाताची (मनगटाची) हालचाल कमी असणे किंवा हाताची (मनगटाची) ताकद कमी असणे किंवा हात व पाय नसणे अशा खेळाडूंचा या गटात समावेश होतो. शाळेत असताना एका दुर्घटनेत सचिनच्या डाव्या हाताला दुखापत झाली. गँगरीनमुळे कोपरापासून मनगटापर्यंतच्या हाताला कायमचे अपंगत्व आले.

सुवर्णपदक जिंकण्याचा ठाम विश्वास होता. त्यामुळे आनंदी आहे. या कामगिरीमुळे मी पॅरिस पॅरा ऑलिंपिकसाठी पात्र झालो असून तिथेही सुवर्णपदक जिंकण्याचा विश्वास आहे.

-सचिन खिल्लारी, सुवर्णपदक विजेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs PBKS Live: रोहित शर्माची माघार! मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल, सलामीला कोणती जोडी?

Mumbai News: भाडेकरूंना मोठा दिलासा! मालमत्तेचा हिस्सा घेतल्यास घरातून बेदखल करता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Asha Bhosle: नातवाला शेवटचा व्हिडिओ कॉल… नातीच्या बोटात नशीबाची अंगठी घातली; आशा भोसलेंचा अखेरचा क्षण, मुलाने केला खुलासा!

मुंबईच्या खेळाडूंना मिळणार वार्षिक करार! पण रोहित शर्मा, शिवम दुबे, सर्फराज खान अपात्र; MCA कडून वर्षाला किती लाख होते मिळणार?

Jalgaon Heatwave : जळगाव जिल्‍ह्यात उष्णतेची लाट कायम! उन्‍हाच्‍या तीव्र झळा; जिल्‍ह्यातील सर्वच शहरांतील तापमान ४२ अंशांवर

SCROLL FOR NEXT