indvs nz e sakal
क्रीडा

WTC फायनल ड्रॉ झाली तर काय? टीम इंडियालाही पडलाय प्रश्न

स्पर्धा जिंकून टेस्टमधील चॅम्पियन कोण होणार? याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना असली तरी चाहत्यांसह दोन्ही संघाला प्लेइंग कंडिशनसंदर्भातील स्पष्टीकरणाची प्रतिक्षा

सुशांत जाधव

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) खेळणारे संघ ठरले असले तरी प्लेइंग कंडिशन काय? याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. 18 ते 22 जून या दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात इंग्लंडमधील साउथहॅम्पटनच्या मैदानात फायनलची लढत रंगणार आहे. स्पर्धा जिंकून टेस्टमधील चॅम्पियन कोण होणार? याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना असली तरी चाहत्यांसह दोन्ही संघाला प्लेइंग कंडिशनसंदर्भातील स्पष्टीकरणाची प्रतिक्षा कायम आहे. फायनल लढत अनिर्णित राहिली किंवा टाय झाली तर काय? पावसामुळे सामना रद्द झाल्यास चॅम्पियन संघ कसा ठरणार? याचे स्पष्टीकरण आयसीसीकडून अद्याप आलेले नाही. आयसीसी पुढील काही दिवसांत यासंदर्भातील चित्र स्पष्ट करेल, अशी अपेक्षा आहे. (World Test Championship Final News Team India waits-for-playing-conditions-icc-to-update-teams-shortly)

भारतीय टीमशी संलग्नित एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना हा काही द्विपक्षीय लढत किंवा कसोटी मालिकेचा भाग नाही. त्यामुळे या लढतीसंदर्भात नियम आणि अटी काय असतील याची माहिती असणे गरजेचे आहे. मॅच ड्रॉ झाली, टाय झाली किंवा पावसाच्या व्यत्ययामुळे निकाल लागू शकला नाही तर विजेता कसा ठरणार? हे आमच्या टीम समोरील तीन प्रमुख प्रश्न आहेत. येत्या काही दिवसांत आयसीसी प्लेइंग कंडिशनसंदर्भातील चित्र स्पष्ट करेल, असा विश्वासही या अधिकाऱ्याने व्यक्त केलाय.

भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी 2 जूनला इंग्लंडला रवाना होणार आहे. भारतातून संघ लंडनला रवाना होणार आहे. याठिकाणाहून लगेच संघ साउथहॅम्पटनला पोहचले. याच ठिकाणी भारतीय संघ क्वारंटाईनची प्रक्रिया पूर्ण करेल. मुंबईत भारतीय संघ एकत्रित येणार असून 24 मे रोजी मुंबईतील स्थानिक खेळाडू बायोबबल वातावरणात दाखल होतील. मयंक अग्रवाल, रविचंद्रन अश्विन, गोलंदाजी कोच भरत अरुण चेन्नईहून चार्टर विमानातून बुधवारी मुंबईत दाखल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : मुंबई महापालिकेत ‘कमळ’ फुलणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्‍वास

Vijay Hazare Trophy live : रोहित शर्माचा पहिल्याच चेंडूवर पुल शॉट अन् झाला बाद; देवेंद्र बोरा चमकला, जाणून घ्या कोण आहे तो

Lucky Rashifal 2026: मीन राशीतील शनीचा प्रभाव! ‘या’ राशींच्या इनकममध्ये होणार मोठी वाढ

Khambatki Ghat : सलग सुट्ट्यांमुळे सातारा–पुणे महामार्गावरील खंबाटकी घाट जाम होणार? एकाच लेनमधून सुरू आहे वाहतूक, 'या' वळणावर अपघाताचाही धोका!

Kalyan-Dombivli Municipal Election : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या जागा वाटपावरून युतीत अनिश्चिततेचे ढग; 73 जागांच्या मागणीने युतीत तणाव !

SCROLL FOR NEXT