cricket stadium 1.png 
क्रीडा

अखेर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल पुढे ढकलली, कारण...

सकाळ ऑनलाइन टीम

नवी दिल्ली- आयपीएल सामन्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक कसोटी चॅम्पियनशीपचा (डब्ल्यूटीसी) अंतिम सामना आठ दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे लंडनमध्ये हा सामना आता 18 जूनपासून खेळवला जाणार आहे. आधी ही चॅम्पियनशीप 10 जून रोजी ऐतिहासिक लॉडर्सवर खेळली जाणार होती. आयपीएलचा अंतिम सामनाही याच तारखेच्या जवळपास होणार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खेळाडूंच्या विलगीकरणावरुन स्थिती कठीण होऊ शकते. 

बीसीसीआयच्या एका सूत्राच्या हवाल्याने 'पीटीआय-भाषा'ने म्हटले की, डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना आता 18 ते 22 जून दरम्यान खेळला जाईल आणि 23 जून हा राखीव दिवस असेल. ही तारीख थोडीशी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आयपीएल संपल्यानंतर सामन्यासाठी आवश्यक विलगीकरणाच्या प्रक्रियेत कोणतीच अडचण येणार नाही. 

आयपीएलचे वेळापत्रक अद्याप निश्चित झालेले नाही. परंतु, ही स्पर्धा मेच्या अखेरीस संपण्याची शक्यता आहे. फायनलमध्ये जागा निश्चित करण्यासाठी भारत (430 गुण, 71.7 टक्के), न्यूझीलंड (420 गुण, 70 टक्के), ऑस्ट्रेलिया (332 गुण, 69.2 टक्के) यांच्यात काट्याची टक्कर आहे. ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका 2-1 ने जिंकल्यानंतर भारतीय टीम पहिल्या क्रमांकावर आहे. 

चुरशीची स्पर्धा 
श्रीलंकेला त्यांच्या देशात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने पराभूत केल्यानंतर इंग्लंड आयसीसी डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या जवळ पोहोचला आहे. इंग्लंड अद्याप चौथ्या क्रमांकावर आहे. भारत 71.7 टक्क्यांसह सर्वोच्च स्थानी कायम आहे तर न्यूझीलंड 70.0 टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

इंग्लंडचे आता 68.7 टक्के गुण आहे आणि ऑस्ट्रेलियापेक्षा ते केवळ 0.5 टक्के अंकानी पिछाडीवर आहेत. ऑस्ट्रेलियाचे 69.2 टक्के अंक आहेत. आयसीसीने टि्वट करताना म्हटले की, श्रीलंकेवर 2-0 विजयानंतर इंग्लंड आता आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशीप गुणतालिकेत ऑस्ट्रेलियापेक्षा 0.5 टक्के अंकानी मागे आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT