WTC Points Table 2023-2025 
क्रीडा

Wi vs Ind: 'एकही मारा लेकिन सॉलिड मारा' विंडीजला धूळ चारत टीम इंडिया WTC पॉइंट्स टेबलमध्ये नंबर-1

Kiran Mahanavar

WTC Points Table 2023-2025 : डॉमिनिका कसोटीत वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 141 धावांनी पराभव करून भारताने केवळ आपले खातेच उघडले नाही, तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत पहिले स्थानही मिळवले आहे. ऑस्ट्रेलियाला मागे टाकत भारताने नंबर-1वर कब्जा केला आहे,

पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात वेस्ट इंडिजला 150 धावांत गुंडाळल्यानंतर टीम इंडियाने आपला डाव 421 धावांवर घोषित केला होता. पहिल्या डावानंतर टीम इंडियाकडे 271 धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावातही वेस्ट इंडिजचा संघ भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही आणि संपूर्ण संघ 130 धावांत गारद झाला.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या आवृत्तीत आतापर्यंत एकूण चार संघांनी किमान एक सामना खेळला आहे. भारताशिवाय या मध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या अॅशेस 2023 मधील पहिले दोन सामने जिंकून दमदार सुरुवात केली, परंतु तिसऱ्या सामन्यातील पराभवानंतर त्यांच्या विजयाची टक्केवारी घसरली आहे. त्यामुळे पहिला सामना जिंकल्यानंतर भारताने 100 टक्के गुणांसह अव्वल स्थान गाठले आहे.

डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये भारताची गुणांची टक्केवारी 100 आहे, त्यानंतर ऑस्ट्रेलियाची 61.11 आणि इंग्लंडची 27.78 आहे. स्लो ओव्हर रेटमुळे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने अॅशेसमध्ये प्रत्येकी दोन गुण गमावले, ज्यामुळे त्यांच्या गुणांच्या टक्केवारीवरही परिणाम झाला.

WTC points table 2023 2025

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, डॉमिनिका कसोटीत यजमान वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांच्या बॅटिंग युनिटने निराशाजनक कामगिरी केली, संपूर्ण संघ 150 धावांत गारद झाला. पहिल्या डावात एकूण 8 बळी घेणाऱ्या अश्विन आणि जडेजाच्या फिरकीला यजमानांकडे उत्तर नव्हते.

यानंतर यशस्वी जैस्वाल (171) आणि कर्णधार रोहित शर्मा (103) यांच्या शतकांच्या जोरावर भारताने एकही विकेट न गमावता वेस्ट इंडिजवर आघाडी घेतली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 229 धावांची भागीदारी झाली. यानंतर विराट कोहलीच्या 76 धावांच्या खेळीमुळे संघाला मोठी धावसंख्या गाठता आली.

भारताने 5 बाद 421 धावांवर डाव घोषित करून विंडीजवर 271 धावांची आघाडी घेतली. यजमान दुसऱ्या डावात फलंदाजी करत आपली ताकद दाखवतील अशी चाहत्यांना अपेक्षा होती, पण यावेळी त्यांचा डाव 130 धावांत गुंडाळला गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

SCROLL FOR NEXT