IND vs NZ Twitter
क्रीडा

WTC_23_PointTable : पाकला तगडी फाईट; टीम इंडियाची टक्केवारी सुधारली

घरच्या मैदानात भारतीय संघाने या पराभवाचा वचपा काढला.

सुशांत जाधव

World Test Championship Standings/ Point Table : मुंबई येथील वानखेडेच्या मैदानात भारतीय संघाने (Team India) इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship ) फायनलमध्ये झालेल्या पराभवाची परतफेड केली. न्यूझीलंडने क्रिकेटच्या पंढरीत (लॉर्ड्स) भारतीय संघाला पराभूत करुन पहिली वहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिप जिंकली होती. घरच्या मैदानात भारतीय संघाने या पराभवाचा वचपा काढला. दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना 372 धावांनी जिंकत टीम इंडियाने मालिका 1-0 अशी खिशात घातली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship (2021-2023) Points Table) दुसऱ्या हंगामातील भारतीय संघाची ही दुसरी मालिका आहे. याआधी भारतीय संघाने इंग्लंड विरुद्धच्या मालिकेने दुसऱ्या हंगामाला सुरुवात केली होती.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेच्या निकालानंतर टीम इंडियाच्या खात्यात 42 गुण जमा झाले आहेत. श्रीलंका (24), पाकिस्तान (24), वेस्ट इंडीज (12), न्यूझीलंड (4) आणि बांगलादेश (0) या संघापेक्षा भारतीय संघाने सर्वाधिक गुण मिळवले असले तरी गुणतालिकेत भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पाँइंट टेबलमध्ये श्रीलंकेचा संघ 24 गुण आणि 100 टक्के विनिंग पर्सेटेजसह अव्वलस्थानी आहे. त्यानंतर पाकिस्तानचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. 24 गुण आणि 66.66 विनिंग पर्सेंटेजसह ते दुसऱ्या स्थानावर आहेत.

न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातील विजयानंतर भारतीय संघाला 12 गुण मिळाले. यापूर्वी पहिला सामना अनिर्णित झाल्यामुळे दोन्ही संघांनी प्रत्येकी 4-4 गुण मिळवले होते. न्यूझीलंड पहिल्या सामन्यात मिळवलेल्या 4 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT