Boxing
Boxing  sakal
क्रीडा

World Women Boxing : भारत-चीनमध्ये पदकांसाठी झुंज

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धा नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी क्रीडा संकुलात सुरू असून आता शनिवार व रविवार या दोन दिवसांमध्ये विविध वयोगटांमध्ये सुवर्णपदकांसाठी झुंज रंगणार आहे. या स्पर्धेमध्ये भारत व चीन या दोन देशांतील महिला खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले असून दोन्ही देशांतील प्रत्येकी चार खेळाडूंनी अंतिम फेरीत धडक मारून सुवर्णपदकासाठी दावेदारी पेश केली आहे.

राष्ट्रकुल स्पर्धा पदक विजेती नीतू घंघास, जगज्जेती निखत झरीन, टोकियो ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक जिंकणारी लवलिना बोर्गोहेन व तीन वेळा आशियाई पदक जिंकलेली स्विटी बुरा या भारताच्या चार खेळाडूंनी आपापल्या वजनी गटात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. चीनकडून वू यू (५२ किलो वजनी गट), यांग चेंगू यू (६३ किलो वजनी गट), यांग लीयू (६६ किलो वजनी गट) व वँग लिना (८१ किलो वजनी गट) या चार खेळाडूंनी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

नीतू घंघासचा झंझावात

दोन वेळा जागतिक युवा स्पर्धेची विजेती नीतू ही ४८ किलो वजनी गटाची अंतिम फेरीची लढत उद्या खेळणार आहे. तिच्यासमोर मंगोलियाच्या लुतसाईखान अल्तांतसेतसेग हिचे आव्हान असणार आहे.

स्विटीला पदकाचा रंग बदलायचाय

भारताची स्विटी बुरा ही ८१ किलो वजनी गटात चीनच्या वँग लिना हिचा सामना करील. स्विटी हिला २०१४ मधील जागतिक स्पर्धेमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. यंदा मात्र तिला पदकाचा रंग बदलायचा ध्यास लागून राहिला आहे.

भारताचा तिसरा क्रमांक

नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या जागतिक स्पर्धेच्या पदकतालिकेत भारताचा क्रमांक तिसरा आहे. चीन ७ पदकांस पहिला, तर कझाकस्तानने ६ पदकांसह दुसरा क्रमांक पटकावला आहे. भारताची चार पदके निश्‍चित झाली आहेत. कोलंबियाही एकूण चार पदकांनिशी भारतासह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Labour Day : गरजूंना हमखास रोजगार मिळवून देणारी ही सरकारी योजना तुम्हाला माहीत आहे का ?

ढिंग टांग : भटकती आत्मा आणि बाबा बंगाली..!

Maharashtra Day 2024: मराठी गिरा दिसो...!

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

SCROLL FOR NEXT