shakib al hasan sakal
क्रीडा

Worldcup Cricket 2023 : विश्‍वकरंडकातील कामगिरी सुमार - शाकीब उल हसन

बांगलादेश क्रिकेट संघाला यंदाच्या एकदिवसीय विश्‍वकरंडकात अपयशाला सामोरे जावे लागत आहे.

सकाळ वृत्तसेवा

कोलकता - बांगलादेश क्रिकेट संघाला यंदाच्या एकदिवसीय विश्‍वकरंडकात अपयशाला सामोरे जावे लागत आहे. नेदरलँड्‌सकडून शनिवारी त्यांचा ८७ धावांनी पराभव झाला. बांगलादेशला सहा लढतींमधून फक्त एकाच लढतीत विजय संपादन करता आला आहे. पाच लढतींमध्ये त्यांना लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. याच पार्श्वभूमीवर बांगलादेशचा कर्णधार शाकीब उल हसन म्हणाला, बांगलादेशची विश्‍वकरंडकाच्या इतिहासातील ही सर्वात सुमार कामगिरी ठरली आहे.

याप्रसंगी शाकीब म्हणाला, विश्‍वकरंडकात आमच्याकडून अत्यंत वाईट कामगिरी झाली आहे. हे मला मान्य आहे, पण आमच्याकडून अशी कामगिरी का होत आहे, याचे उत्तर माझ्याकडे नाही. आमच्या गोलंदाजांनी नेदरलँड्‌स संघातील फलंदाजांना रोखण्याचे काम केले. क्षेत्ररक्षणात चुका झाल्या. फलंदाजांना प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आली नाही. संपूर्ण स्पर्धेमध्ये फलंदाज अपयशी ठरत आहेत, हा चिंतेचा विषय आहे. नेदरलँड्‌स संघाला दोन गुण बहाल केले. हे पटण्यासारखे नाही आहे, असे तो पुढे म्हणाला.

तमिमच्या अनुपस्थितीचा फटका

तमिम इक्बाल याने जुलै महिन्यात तडकाफडकी राजीनामा दिला होता, पण पंतप्रधान शेख हसीना यांच्या मधस्थीनंतर त्याने राजीनामा मागे घेतला. तो विश्‍वकरंडकासाठी सज्जही होत होता, पण कर्णधार शाकीब उल हसन याने तमिमच्या तंदुरुस्तीवरून त्याला बांगलादेशच्या संघात स्थान दिले नाही. मात्र याचा फटका त्यांना विश्‍वकरंडकात बसला.

तमिम हा बांगलादेशचा एकमेव फलंदाज होता की, ज्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत शतके झळकावली होती. तमिमच्या अनुपस्थितीमुळे संघाचा समतोल बिघडला. शाकीब याने पत्रकार परिषदेत हे मान्य केले. आम्ही विश्‍वकरंडकासाठी पूर्णपणे तयार नव्हतो, असेही त्याने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT