Rohit Sharma Sakal
क्रीडा

Worldcup Cricket 2023 : रोहितचा हल्लाबोल पवित्रा संघासाठी निर्णायक - राठोर

खेळपट्टी कशीही असो, समोर कोणताही गोलंदाज असो, आपण पहिल्या चेंडूपासून हल्ला करणार, ही रोहितचीच कल्पना आहे.

पीटीआय

कोलकता - रोहित शर्माने या विश्वकरंडक स्पर्धेत भले अधिक शतके केली नसतील, डावाच्या सुरुवातीला तो करत असलेल्या तुफानी फटकेबाजीमुळे संघाला वेगवान सलामीचा फायदा होत आहे, असे मत फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोर यांनी व्यक्त केले.

रोहितने या स्पर्धेत एक शतक (१३१) आणि दोन अर्धशतके केली आहेत; परंतु त्याच्या आक्रमक सलामीत चांगलेच सातत्य राहिले आहे. रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात रोहितने २४ चेंडूंत ४० धावांचा झंझावात सादर केला. त्यानंतर खेळपट्टी संथ होत असतानाही भारतीयांनी ५० षटकांत ५ बाद ३२६ धावा उभारल्या.

खेळपट्टी कशीही असो, समोर कोणताही गोलंदाज असो, आपण पहिल्या चेंडूपासून हल्ला करणार, ही रोहितचीच कल्पना आहे. खेळपट्टी फलंदाजीस पोषक असेल तर रोहित बिनधास्तपणे आपले फटके मारतो. त्याची ही योजना यशस्वी ठरत आहे. तो कर्णधार या नात्यानेही आघाडीवर राहून लढत आहे, असा गौरव राठोर यांनी केला.

आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात रोहित आणि गिल यांनी आतापर्यंत इतर संघांना धडकी भरवणाऱ्या लुंगी एन्गिडी आणि मार्को यान्सेन यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे त्यांची लय बिघडली. रोहित शर्मा बाद होईपर्यंत या दोघांनी पॉवर-प्लेमध्ये ९१ धावांची सलामी दिली. त्यामुळे विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांना डावाच्या मध्यावर खेळपट्टी संथ होत असताना सावध खेळ करता आला.

खेळपट्टी हळूहळू संथ होत असल्याने केशव महाराज धोकादायक ठरू शकतो, असे आम्ही जाणले. त्यामुळे त्याची गोलंदाजी सावधपणे खेळण्याचा सल्ला आम्ही विराट आणि अय्यर यांना दिला होता. ११ ते २० या दहा षटकांत धावांचा वेग कमी झाला तरी त्याचा परिणाम झाला नाही. कारण रोहितच्या आक्रमक फलंदाजीने अगोदरच पाठबळ मिळाले होते, असे राठोर म्हणाले.

विराटने तर सचिनच्या ४९ व्या एकदिवसीय शतकाशी बरोबरी करून सर्वांची मने जिंकली, पण अय्यरची ८७ चेंडूतील ७७ धावांची खेळीही मोलाची ठरली.

पॉवर-प्ले मधील रोहितचा हल्लाबोल -

सामने - ८. धावा - २६५ (चेंडू २०३), सरासरी - ८८.३, स्ट्राईक रेट - १३०.५. चौकार - ३१. षटकार - १६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

Shardiya Navratri 2026 : शारदीय नवरात्रीत बनत आहेत 4 मोठे राजयोग; माता लक्ष्मीच्या कृपेने 'या' राशी होणार मालामाल, करिअरमध्येही प्रगतीचे संकेत

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

SCROLL FOR NEXT