Afghanistan Players Sakal
क्रीडा

Srilanka vs Afghanistan : श्रीलंका-अफगाणिस्तान विश्‍वकरंडकाची लढत आज रंगणार पुण्यात

श्रीलंका व अफगाणिस्तान यांच्यामध्ये आज (ता. ३०) एकदिवसीय विश्‍वकरंडकातील साखळी फेरीची लढत पुण्यामध्ये रंगणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - श्रीलंका व अफगाणिस्तान यांच्यामध्ये आज (ता. ३०) एकदिवसीय विश्‍वकरंडकातील साखळी फेरीची लढत पुण्यामध्ये रंगणार आहे. दोन्ही देशांना प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी विजयाची नितांत गरज आहे. या लढतीत ज्या देशाचा पराभव होईल, त्या देशाचे आव्हान संपल्यात जमा आहे.

श्रीलंकन संघाला पहिल्या तीन लढतींत दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान व ऑस्ट्रेलिया या देशांविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे त्यांचा पाय खोलात गेला होता. मात्र त्यानंतर श्रीलंकन संघाने नेदरलँड्‌स व इंग्लंडला धूळ चारून उपांत्य फेरीत पोहोचण्याचे आव्हान कायम ठेवले.

आगामी दिवसांत त्यांना भारत, बांगलादेश व न्यूझीलंड या देशांचा सामना करावयाचा आहे. भारत व न्यूझीलंड यांच्याविरुद्ध त्यांना खडतर आव्हानाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत त्यांचा संघ विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल.

निसांका, समरविक्रमा फॉर्ममध्ये

श्रीलंकेसाठी पाथुम निसांका व सदीरा समरविक्रमा हे दोन फलंदाज छान खेळ करीत आहेत. निसांका याने चार, तर समरविक्रमाने दोन अर्धशतके झळकावली आहेत. कुशल मेंडिस यानेही एक शतक झळकावले आहे. मात्र श्रीलंकेला फलंदाजीत सांघिक यशाची गरज आहे.

कुमाराला दुखापत

श्रीलंकन संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज लहिरु कुमारा याला दुखापत झाली आहे. यामुळे त्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत खेळता येणार नाही. दुशमंता चमीरा याची त्याच्याऐवजी निवड करण्यात आली आहे. दिलशान मदुशंका व कसून रजिता या गोलंदाजांकडून आशा आहेत.

महीश तीक्षणा या फिरकी गोलंदाजाकडूनही अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूज याच्या आगमनाचा फायदा श्रीलंकेला इंग्लंडविरुद्धच्या लढतीत झाला. मधल्या टप्प्यात तो अव्वल दर्जाची गोलंदाजी करू शकतो.

धावांचा पाऊस पडणार...

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियममधील खेळपट्टीवर पुन्हा एकदा धावांचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम झादरन, हाश्‍मतुल्लाह शाहिदी, रहमत शाह यांच्याकडून चमकदार फलंदाजीची आशा आहेत. राशीद खान, मोहम्मद नबी व मुजीब उर रहमान या फिरकीवीरांनी वेळोवेळी स्वत:ला सिद्ध केले आहे. आता त्यांना श्रीलंकन फलंदाजांना रोखावे लागणार आहे.

आत्मविश्‍वास उंचावणारे विजय

श्रीलंका-अफगाणिस्तान यांच्यामध्ये आतापर्यंत ११ लढती झाल्या आहेत. यापैकी अफगाणिस्तानला फक्त तीनच लढतींमध्ये विजय संपादन करता आला आहे. अफगाणिस्तानने दोन विजय मागील वर्षभरात मिळवलेले आहेत. या दोन विजयांमुळे उद्या होणार असलेल्या लढतीआधी अफगाणिस्तानी खेळाडूंचा आत्मविश्‍वास नक्कीच उंचावला असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: 'स्वातंत्र्यदिनापूर्वी मोठी घटना घडणार, मुंबईत बॉम्बस्फोट करणार...', महापौर रितू तावडेंना धमकीचा मेल

Dr Bhushan Patwardhan: प्रज्ञानातून मानवकल्याणाचा भाव जागृत होईल: डॉ. भूषण पटवर्धन, ‘सकाळ प्रकाशन’तर्फे तीन पुस्तकांचे प्रकाशन

Flipkart Freedom Sale 2026: 8 ऑगस्टपासून सेल; iPhone पासून लॅपटॉपपर्यंत मोठी बचत! ऑफर्स पाहून व्हाल खुश, शॉपिंगपूर्वी नक्की वाचा!

Marathi News Live Updates : अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यांवर भडकले

Mumbai Local Train: लोकलच्या सीटवर महिला झोपली, पुरुष प्रवाशाला राग अनावर; शिवीगाळ करत पट्टा काढला अन्...; Video Viral

SCROLL FOR NEXT