Shafali Verma no Ball Controversy News In Marathi
Shafali Verma no Ball Controversy News In Marathi 
क्रीडा

Shafali Verma News: 'अंबानीने अंपायर घेतले होते खिशात...' शेफालीची विकेट वादाच्या भोवऱ्यात; दिल्लीने ही उपस्थित केला प्रश्न

सकाळ ऑनलाईन टीम

Shafali Verma no Ball Controversy : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या अतिशय रोमांचक अंतिम सामन्यात हरमनच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. दिल्ली कॅपिटल्स संघाने शेवटच्या षटकापर्यंत सामना जिंकण्याची आशा सोडली नव्हती. महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम जिंकणारी हरमन पहिली विजेती कर्णधार ठरली.

दिल्ली संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. पहिल्या षटकात केवळ दोन धावा केल्या. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शेफाली वर्माने षटकार ठोकला. पुढच्याच चेंडूवर त्याने इसी वँगविरुद्ध चौकार मारला. तिसरा चेंडू फुल टॉसचा होता, ज्यावर शेफाली वर्मा झेलबाद झाली.(Latest Sport News)

शेफाली वर्माच्या बॅटला चेंडू लागताच चेंडू हवेत गेला, नॉन स्ट्राइकवर उभी असलेली कॅप्टन मेग लॅनिंग आणि शेफालीने स्वतः मैदानावरील पंचांना प्रश्न केला, तो चेंडू कमरेच्या वर नाही का? मैदानावरील अंपायरने तिला आऊट दिले, पण WPL नियमांनुसार, नो बॉल आहे की उंच फुल टॉस आहे हे पाहण्यासाठी डीआरएस घेता येतो.

थर्ड अंपायरने प्रथम चेंडूची उंची पाहिली. शेफाली कुठे खेळतेय हेही पाहिलं. यानंतर, जेव्हा चेंडूचा मार्ग दिसला, तेव्हा चेंडू कमरेच्या वर आणि स्टंप वरून जाताना दिसत होता. तिसऱ्या पंचाने हा निर्णय बदलला नाही आणि शेफाली वर्माला आऊट दिला.

दिल्ली कॅपिटल्सनेही यावर प्रश्न उपस्थित केले आहेत, तर क्रिकेट चाहते मुंबई इंडियन्सवर टीका करत आहेत. दिल्ली कॅपिटल्सच्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. या निर्णयात लोक मुंबई इंडियन्सला वेगवेगळ्या प्रकारे सहभागी करून घेत आहेत. एकाच्या चाहत्याने कमेंट करताना लिहिले की, अंबानीने अंपायर खिशात घेतले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: 'नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवू'; धमकीचा मेल आल्याने खळबळ

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT