WPL 2023 Anjum Chopra  esakal
क्रीडा

WPL 2023 Anjum Chopra : भारतीयांना सोडून... माजी क्रिकेटपटू अंजुम चोप्राने फ्रेंचायजींना फटकारले

अनिरुद्ध संकपाळ

WPL 2023 Anjum Chopra : भारतीय महिला क्रिकेटविश्व बदलणारी लीग वुमसन्स प्रीमियर लीगचा पहिला हंगाम आजापासून सुरू होत आहे. पहिला सामना हा गुजरात जायंट्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. दरम्यान, रंगारंग उद्घाटन सोहळ्याने Women's Primer League चा नारळ फुटला. मात्र भारताची माजी कर्णधार आणि समालोचक अंजुम चोप्राने लीगमधील फ्रेंचायजींबद्दल नाराजी व्यक्त केली.

अंजुम चोप्रा एका कार्यक्रमात म्हणाली की, 'जास्तीजास्त संघांनी आपल्या संघाची कर्णधार ही विदेशी निवडली. मला ही गोष्ट आवडलेली नाही. ही भारतीय लीग आहे. ही भारतीय वातावरणात, खेळपट्ट्यांवर खेळली जाणार आहे. जर भारतीय खेळाडूंमध्ये कर्णधार होण्याची पात्रता असेल तर त्यांना संघाची कर्णधार करायला हवं होतं.'

अंजुम चोप्राने उठवलेला मुद्दा हा योग्य आहे. कारण पाच फ्रेंचायजींपैकी फक्त दोन फ्रेंचायजींनी कर्णधारपदी भारतीय खेळाडूची निवड केली आहे. मुंबई इंडियन्सने भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरकडेच आपल्या संघाची धुरा सोपवली आहे. तर रॉयल चॅलेंजर बेंगलोरने स्मृती मानधनाला कर्णधार केलं आहे.

मात्र गुजरात जायंट्सने ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनीला, दिल्ली कॅपिटल्सने ऑस्ट्रेलियाच्याच मेग लेनिंग आणि यूपी वॉरियर्सने ऑस्ट्रेलियाच्याच एलिसा हेलीला कर्णधार केले आहे.

जागतिक महिला क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचा दबदबा आहे. त्यांनी तब्बल सहावेळा टी 20 वर्ल्डकप जिंकला आहे. त्यामुळे WPL च्या पहिल्या हंगामाच्या लिलावात देखील त्यांची चलती होती. याचबरोबर आता संघांचे कर्णधारपद पटकावण्यातही त्यांनी आघाडी घेतली. पात पैकी 3 संघाच्या कर्णधारपदी ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू आहेत.

(Sports Latest News)

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT