Sania Mirza
Sania Mirza  Sakal
क्रीडा

Sania Mirza : नमस्कारा सानिया म्हणत RCB ने टेनिस स्टार सानियाला दिली मोठी जबाबदारी

सकाळ डिजिटल टीम

Sania Mirza : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाची महिला प्रीमियर लीगमधील (WPL) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा : नेट बँकिंग सुविधा वापरताय? मग हे नक्कीच वाचा...

आरसीबीने बुधवारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबतची माहिती दिली आहे. RCB क्रिकेट संघाची मार्गदर्शक म्हणून मिळालेली ऑफरनंतर आपल्याला स्वतःला आश्चर्य वाटले होते, पण नंतर ही ऑफर स्वीकारल्याचे सानियाने म्हटले आहे.

आरसीबी हा एक लोकप्रिय संघ आहे आणि आयपीएलमध्ये अनेक वर्षांचा फॉलो केलेला संघ आहे. त्यांनी महिला प्रीमियर लीगसाठी एक संघ तयार करताना पाहून मला खूप आनंद होत असल्याचे सानियाने म्हटले आहे.

मी 20 वर्षांहून अधिक काळ व्यावसायिक ऍथलीट आहे. माझे पुढचे काम तरुण महिला आणि तरुणींना खेळ हा त्यांच्या करिअरच्या पहिल्या पर्यायांपैकी एक असू शकतो हे पटवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सानियाने म्हटले आहे.

कोणत्याही खेळातील दबाव हाताळणे ही सर्वात महत्वाची बाब आहे. त्यासाठी आपण खेळाडूंसोबत त्यांच्या मानसिक पैलूवर काम करणार असल्याचे यावेळी सानियाने सांगितले. क्रिकेट आणि टेनिसमध्ये खूप समानता आहेत. सर्वात मोठे चॅम्पियन ते आहेत जे दबाव हाताळू शकतात.

13 फेब्रुवारी रोजी झालेल्या महिला प्रीमियर लीग लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने स्मृती मंधानाला 3.4 कोटींमध्ये विकत घेतले आणि या लीगच्या इतिहासात विकली जाणारी ती पहिली खेळाडू ठरली. यासोबतच मंधाना ही लीगमधील सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. मंधना व्यतिरिक्त टीममध्ये सोफी डिव्हाईन, एलिस पेरी, रेणुका सिंग आणि रिचा घोष यांनाही स्थान देण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणसीतून मैदानात, दिग्गजांच्या उपस्थितीत दाखल केला अर्ज

Fact Check: शिवसेनेच्या (UBT) मिरवणुकीत पाकिस्तानचा झेंडा फडकवल्याचा नितेश राणे यांचा दावा, वाचा काय आहे सत्य

Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी वाराणसीमध्ये दाखल; थोड्याच वेळात भरणार उमेदवारी अर्ज..

VIDEO: 'गजगामिनी चाल' म्हणजे काय? अदिती राव हैदरीच्या 'त्या' वॉकनं नेटकऱ्यांना लावलं वेड, व्हिडीओ होतोय व्हायरल

Loksabha Election Voting : आयर्लंड, अमेरिकेहून येत दांपत्य, युवतींचे मतदान; मराठवाड्यातील परदेशस्त भारतीयांनीही बजावले राष्ट्रीय कर्तव्य

SCROLL FOR NEXT