wpl 2023 UPW vs GG Grace Harris stars as UP Warriors clinch last over thriller beat Gujarat Giants by 3 wickets  
क्रीडा

WPL : गुजरातच्या तोंडचा विजय हिसकावला! यूपी वॉरियर्सची धमाकेदार सुरुवात; तीन षटकात फिरला सामना

आदानीच्या गुजरातचा सलग दुसरा पराभव

Kiran Mahanavar

UP Warriors vs Gujarat Giants : महिला प्रीमियर लीग 2023 मध्ये रविवारी यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात तिसरा सामना खेळला गेला. नवी मुंबईतील डॉ डी वाय पाटील स्पोर्ट्स अकादमीत दोन्ही संघ आमनेसामने आले. यूपीने गुजरातचा तीन गडी राखून पराभव केला आहे. गुजरातचा या स्पर्धेतील हा सलग दुसरा पराभव आहे.

गुजरात जायंट्स सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. याआधी पहिल्या सामन्यात गुजरात संघाला मुंबईविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने सहा गडी गमावत 169 धावा केल्या. प्रत्युत्तरात यूपीने एक चेंडू शिल्लक असताना सात विकेट्सवर 175 धावा करून सामना तीन विकेट्सने जिंकला. यूपीकडून ग्रेस हॅरिसने 26 चेंडूत 59 धावांची शानदार खेळी करत गुजरातच्या जबड्यातून सामना हिसकावून घेतला. या स्पर्धेत प्रथमच एखाद्या संघाने लक्ष्याचा पाठलाग करून विजय मिळवला आहे.

यूपी वॉरियर्सला शेवटच्या 3 षटकात विजयासाठी 53 धावांची गरज होती. हॅरिसने किम गार्थच्या डावातील 18व्या षटकात सलग 3 चौकार मारले. गार्डनरच्या डावाच्या 19व्या षटकात 14 धावा झाल्या, ज्यात सोफी एक्लेस्टोनने शानदार षटकार ठोकला.

त्यानंतर शेवटच्या षटकात 19 धावांची गरज होती. सदरलँडच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर हॅरिसने षटकार ठोकला. तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवर मिसफिल्डवर चौकार मारला. पाचव्या चेंडूवर हॅरिसने षटकार ठोकून संघाला आनंद साजरा करण्याची संधी दिली.

हॅरिसने 26 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांसह 59 धावा केल्या आणि नाबाद परतला. सोफीने 12 चेंडूत एक चौकार आणि एका षटकारासह नाबाद 22 धावा करत महत्त्वपूर्ण योगदान दिले. दोघांनी 8व्या विकेटसाठी 70 धावांची नाबाद भागीदारी केली. गुजरातकडून किम गर्थने 5 बळी घेतल्या.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या गुजरात जायंट्सने चांगली सुरुवात झाली. एस मेघना आणि सोफिया डंकले यांनी पहिल्या विकेटसाठी 34 धावा जोडल्या. सोफियाने 24 धावा करून चौथ्या षटकात आणि मेघनाने 13 धावा करून पाचव्या षटकात विकेट गमावली. अॅनाबेल सदरलँड आणि सुषमा वर्मा यांना फार काही करता आले नाही. सदरलँडने आठव्या आणि सुषमाने 11व्या षटकात आपली विकेट गमावली.

मात्र, हरलीन देओलने एक टोक धरुन ठेवले. त्याने अॅशले गार्डनर सोबत पाचव्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी करून संघाला 100च्या पुढे नेले, पण गार्डनर 16व्या षटकात बाद झाला. यानंतर हरलीनने दयालन हेमलतासोबत सहाव्या विकेटसाठी 22 धावांची भागीदारी केली.

त्यानंतर हरलीन 18व्या षटकात पॅव्हेलियनमध्ये परतली. त्याने 32 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 46 धावांची खेळी केली. कार्यवाहक कर्णधार स्नेह राणा आणि हेमलता यांनी सातव्या विकेटसाठी 27 धावांची अखंड भागीदारी केली. राणाने 7 चेंडूत नाबाद 9 धावा केल्या. हेमलताने 13 चेंडूंचा सामना केल्यानंतर नाबाद 21 धावांची खेळी केली. त्याने 2 चौकार आणि 1 षटकार मारला. यूपीकडून दीप्ती शर्मा आणि सोफी एक्लेस्टोनने प्रत्येकी दोन तर अंजली सरवानी आणि ताहलिया मॅकग्राने प्रत्येकी एक विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेटचा देव 'सचिन' जेव्हा फुटबॉलचा सुपरस्टार मेस्सीला भेटला, 10 नंबरची जर्सी देताना काळ थांबला… वानखडेवरील 'तो' क्षण Viral

Latest Marathi News Live Update: स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी वानखेडे स्टेडियममधून रवाना

Baramati Politics:'बारामतीत राष्ट्रवादी व भाजपचे परस्परांवर आरोप प्रत्यारोप'; उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोरील आंदोलनाचे उमटले राजकीय पडसाद..

Google Search : रात्रीच्या वेळेस पुरुष गुगलवर सगळ्यात जास्त काय सर्च करतात? 2025 च्या नव्या रिपोर्टने दुनिया हादरली

Raju Shetti: शक्तीपीठ महामार्ग रेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा अटापिटा: राजू शेट्टींचा आरोप; टेंडरसाठी बड्या कंपन्यांकडून घेतला ॲडव्हान्स ?

SCROLL FOR NEXT