WPL 2024 Auction ESAKAL
क्रीडा

WPL 2024 Auction : वुमन्स प्रीमियर लीगच्या लिलावाची तारीख ठरली, फ्रेंचायजींच्या सॅलरी पर्समध्ये मोठी वाढ?

अनिरुद्ध संकपाळ

WPL 2024 Auction : वुमन्स प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामाची म्हणजे WPL 2024 च्या लिलावाची तारीख बीसीसीआयने निश्चित केली आहे. हा लिलाव 9 डिंसेबरला मुंबईत होणार आहे.

वुमन्स प्रीमियर लीगच्या दुसऱ्याच हंगामाच्या लिलावात फ्रेंचायजींच्या सॅलरी पर्समध्ये 13.5 कोटींची वाढ करण्यात आली आहे. यंदाची वुमन्स प्रीमियर लीग ही फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबतची अधिकृत माहिती अजून देण्यात आलेली नाही. यंदाची वुमन्स प्रीमियर लीग ही मुंबई किंवा बंगळुरूमध्ये 5 संघात होईल.

यंदाच्या लिलावात गुजरात जायंट्सकडे सर्वाधिक पैसे असणार आहेत. त्यांच्याकडे सध्या 5.95 कोटी रूपये शिल्लक आहेत. त्यांना अजून 10 खेळाडूंची जागा भरायची आहे. त्यानंतर गेल्या हंगामातील उपविजेता युपी वॉरियरकडे 4 कोटी रूपये शिल्लक आहेत.

स्मृती मानधनाच्या रॉयल चॅलेंजर बेंगलोरकडे 3.35 कोटी रूपये शिल्लक आहेत. त्यांना 7 जागा भरायच्या आहेत. गतविजेत्या मुंबईकडे 2.1 कोटी तर दिल्ली कॅपिट्सकडे 2.25 कोटी रूपये शिल्लक आहेत. मुंबईला 5 तर दिल्लीला 3 जागा भरायच्या आहेत.

आसीबी 3 विदेशी तर मुंबई आणि दिल्ली यांच्याकडे प्रत्येकी 1 एका विदेशी खेळाडूचा स्लॉट शिल्लक आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT