WPL Auction Harmanpreet Kaur esakal
क्रीडा

WPL Auction Harmanpreet Kaur : एकेकाळची षटकार क्वीन हरमनप्रीत संपल्यात जमा? ज्यूनियर खेळाडूंनीही...

अनिरुद्ध संकपाळ

WPL Auction Harmanpreet Kaur : वुमेन्स प्रीमियर लीग 2023 साठी 13 फेब्रुवारीला ऐतिहासिक लिलाव पार पडला. पाच संघांनी जगभरातील महिला क्रिकेटपटूंवर पैशांचा पाऊस पाडला. भारताची उपकर्णधार स्मृती मानधनाच्या नावाने बोली सुरू झाली. तिला रॉयल चॅलेंजर बेंगलोरने 3.4 कोटी इतकी सर्वाधिक बोली लावत आपल्या गोटात घेतले. लिलावातील पहिलीच बोली सर्वोच्च ठरली.

यानंतर नाव आलं ते भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचं! स्मृतीला 3.4 कोटींची बोली लागल्यानंतर हरमनप्रीत देखील याच आसपास जाईल असा अंदाज होता. मात्र मुंबई इंडियन्सने हरमप्रीत कौरला 1.8 कोटी बोली लावत आपल्या संघाचा भाग करून घेतले.

हरमनप्रीतला स्मृतीपेक्षा कमी बोली लागली. यावेळी स्मृतीला महिला क्रिकेट वर्तुळात असलेलं ग्लॅमर तिला इतकी बोली देऊन गेलं असं बोललं जाऊ लागलं.

मात्र हा भ्रमाचा भोपळा थोड्या अवधीतच फुटला. भारताच्या तुलनेनं ज्यूनियर असलेल्या खेळाडूंनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेत एका पाठोपाठ एक हरमप्रीत कौरला मागे टाकण्यास सुरूवात केली. यामुळे हरमनप्रीत कौरचा काळ आता संपला की काय अशी शंका मनात उपस्थित झाली.

6 खेळाडूंनी टाकलं हरमनला मागं

भारतीय महिला क्रिकेटपटूंचा विचार केला तर भारतीय संघातील अनेक क्रिकेटपटूंना कोट्यावधी रूपयांची बोली लागली. यात हरमनप्रीत कौरचा देखील समावेश आहे. मात्र भारतीय खेळडूंवर लागलेल्या सर्वोच्च बोलीची यादी पाहिली तर हरमनप्रीत कौर या यादीत 6 व्या स्थानावर फेकली गेली आहे.

स्मृती मानधना - 3.40 कोटी आरसीबी

दिप्ती शर्मा - 2.60 कोटी यूपी वॉरियर्स

जेमिमाह रॉड्रिग्ज - 2.2 कोटी दिल्ली कॅपिटल्स

शफाली वर्मा - 2 कोटी दिल्ली कॅपिटल्स

ऋचा घोष - 1.90 कोटी आरसीबी

पूजा वस्त्रकार - 1.90 कोटी मुंबई इंडियन्स

हरमनप्रीत कौर - 1.80 कोटी मुंबई इंडियन्स

हरमनचा काळ संपला?

हरमनप्रीत कौर ही भारताची एक मॅच फिनिशर म्हणून ओळखली जात होती. तिला भारतीय महिला टीमची युवाराज सिंगही म्हटलं जायचं. कारण ती फलंदाजी पाठोपाठ गोलंदाजीतही आपली भुमिका बजावत होती. भारतीय संघातील लिलया षटकार मारणारी हरमनप्रीत कौर कधीकाळी एकमेव फलंदाज होती.

मात्र गेल्या काही काळापासून तिचा मॅच फिनिशर म्हणून असलेला करिष्मा ओसरत चालला आहे. गोलंदाजीतही ती फारशी चांगली कामगिरी करत नाहीये. दुसरीकडे संघात अनेक युवा खेळाडू मॅच फिनिशर खेळाडू म्हणून आपली ओळख निर्माण करत आहेत. हरमनप्रीत कौर आता 35 वर्षाची होत आहे.

कशी आहे हरमनची कारकीर्द

हरमनने भारताकडून आतापर्यंत तीन कसोटी सामने, 124 वनडे आणि 147 टी 20 सामने खेळले आहेत. कसोटीत तिने फक्त 38 धावा केल्या आहेत. वनडेत तिने 38.18 च्या सरासरीने 3322 धावा ठोकल्या आहेत. यात 5 शतके आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे.

हरमनप्रीतने टी 20 क्रिकेटमध्ये देखील एक शतक आणि 9 अर्धशतके ठोकत 2956 धावा केल्या आहेत. हरमनने गोलंदाजीतही आपले योगदान दिले. तिने कसोटीत 9 विकेट्स, वनडेत 31 आणि टी 20 मध्ये 32 विकेट्स घेतल्या आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT