क्रीडा

सुशिल कुमारने शूट करायला लावला होता सागरच्या हत्येचा VIDEO

सूरज यादव

नवी दिल्ली - पैलवान सागर हत्या प्रकरणात ऑलिंपिक पदक विजेता पैलवान सुशिल कुमारच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचं पथक सुशिल कुमारला घेऊन चंदिगढ आणि हरयाणाला गेली होती. या प्रकरणाचा सध्या तपास सुरु असून सुशिल कुमारने यामध्ये सहभागी असलेल्या अनेकांची नावे सांगितली आहेत. सुशिल कुमारने ज्या लोकांची नावे सांगितली आहेत. त्यामध्ये हरयाणा आणि चंदिगढमध्ये राहणाऱे आहेत. फरार असलेल्या आरोपिंविरोधात वॉरंट जारी कऱण्यात आलं आहे. फरार आरोपींची नावे विरेंद्र उर्फ विंदर आणि रोहित उर्फ करोर अशी आहेत.

सुशिल कुमारला गेल्या आठवड्यात पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी सांगितलं की, सुशिल कुमारने त्याची दहशत वाढवण्यासाठी या घटनेचा व्हिडिओ मित्रांना करायला सांगितला होता. यामध्ये सागर जमिनीवर पडलेला दिसतो. तर सुशिल कुमार आणि तिघे जण त्याच्या भोवती उभा असलेले दिसतात. सुशिल कुमार त्याच्या मित्रांसह सागरला काठीने मारत असलेला व्हिड़िओ व्हायरल होत आहे. यात सागर जमिनीवर आडवा झाल्याचं दिसत आहे. गंभीर मारहाणीत सागरचा मृत्यू झाला.

दिल्लीत छत्रसाल स्टेडियममध्ये 4 मे रोजी पैलवानांच्या गटामध्ये हाणामारी झाली होती. यामध्ये सागरचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी सुशिल कुमार याच्यासह सहा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आले ङोते. त्यानंतर फरार झालेल्या सुशिल कुमारला पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक राज्यात पथके पाठवली होती. अखेर सुशिल कुमार पोलिसांच्या जाळ्यात सापडला. आता या प्रकरणाचा तपास पोलिस करत असून सुशिल कुमारची कसून चौकशी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT